advertisement

Air Canada Express Plane Accident: रनवेवर विमान आणि ट्रकचा भीषण अपघात, लॅण्डिंगदरम्यान चूक अन् घात झाला, VIDEO

Last Updated:

New York LaGuardia येथे Air Canada Express CRJ 900 विमान आणि फायर ट्रक धडकले. अनेक प्रवासी जखमी, रनवे 4 बंद, FAA ने सर्व उड्डाणे थांबवली.

News18
News18
80 प्रवाशांनी भरलेलं विमान लॅण्डिंग करण्याआधीच घात झाला आणि थरकाप उडाला. ट्रॅफिक कंट्रोलर घाबरून मोठ्याने STOP STOP STOP ओरडत राहिला मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. विमानाच्या पुढच्या भागाचा नोजचा चुराडा झाला होता. प्रवासी देखील जखमी झाले होते. रनवेवर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झाला. एअर कॅनडा एक्सप्रेसचं CRJ-900 हे विमान धावपट्टीवरच एका मोठ्या फायर ट्रकला जाऊन धडकलं आणि अपघात झाला.
दरम्यान ATC आणि वैमानिक यांच्यातील एक संवादाचा एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. न्यूज 18 मराठी या ऑडिओ क्लीपची कोणतीही खातरजमा करत नाही. ऑडिओमध्ये ऐकू येतंय की, सुरुवातीला ट्रक १ ला रनवे क्रॉस करण्याची परवानगी मागितली जाते. पण अचानक परिस्थिती हाताबाहेर जाते. समोरून विमान येत असल्याचं लक्षात येताच एटीसी अधिकारी ओरडू लागतो, "ट्रक १, थांबा! मुळीच पुढे जाऊ नका!" मात्र, काही सेकंदातच विमानाची आणि ट्रकची भीषण धडक होते. या धडकेनंतर एटीसी अधिकारी पुढच्या विमानाला ओरडून सांगतो, "डेल्टा २६०३, गो-अराऊंड! रनवे बंद आहे!"
advertisement
या धडकेत एअर कॅनडाच्या विमानाचं अतोनात नुकसान झालं आहे. विमानाचा पुढचा भाग अक्षरशः चिरडला गेलाय. अपघातानंतर विमानातील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. तातडीने इमर्जन्सी एक्झिटमधून प्रवाशांना रनवेवर उतरवण्यात आलं. विमानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यात विमानाची झालेली अवस्था पाहून अंगावर काटा येईल. या भीषण धडकेत जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, मात्र अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही.
advertisement
advertisement
या अपघातामुळे न्यू यॉर्कमधील लागुआर्डिया विमानतळ पूर्णपणे बंद करण्यात आलं. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (FAA) सर्व उड्डाणं तात्पुरती रद्द केली आहेत. रनवे ४ आता पूर्णपणे बंद आहे, असा मेसेज जगातील सर्व वैमानिक आणि विमान कंपन्यांना पाठवण्यात आला आहे. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या या भीषण अपघातामुळे खळबळ उडाली आहे. एटीसीने वारंवार ओरडूनही तो ट्रक नेमका रनवेवर का आला? सिग्नलमध्ये चूक झाली की मानवी चुकांमुळे हा घात झाला? याचा तपास आता अमेरिकन तपास यंत्रणा युद्धपातळीवर केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Air Canada Express Plane Accident: रनवेवर विमान आणि ट्रकचा भीषण अपघात, लॅण्डिंगदरम्यान चूक अन् घात झाला, VIDEO
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement