advertisement

Nashik News: नाशिकच्या गावांमधील बाह्य रिंग रोडचा विकास होणार, भूसंपादनासाठी किती दिवसांसाठी दिली मुदत?

Last Updated:

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त दिंडोरी तालुक्यातील तीन गावांतील जमिनीची बाह्य रिंग रोडच्या विकासासाठी मोजणी प्रक्रिया आटोपली आहे.

Nashik Kumbhmela News
Nashik Kumbhmela News
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सध्या नाशिकमध्ये अनेक प्रोजेक्ट्सचे कामं हाती घेण्यात आलेले आहेत. कुंभमेळ्यानिमित्त दिंडोरी तालुक्यातील तीन गावांतील जमिनीची बाह्य रिंग रोडच्या विकासासाठी मोजणी प्रक्रिया आटोपली आहे. जमीन मोजणीच्या प्रक्रियेला दिंडोरी तालुक्यांतील गावांमधून सुरूवात करण्यात आली आहे. मोजणी प्रक्रियेला सुरूवात झाली असताना जिल्हा प्रशासनाने पुढच्या 15 दिवसांमध्ये काही हरकत असल्यास त्या मागवल्या आहेत. कोणत्याही मालकी गटांना जर कोणतीही हरकत असेल तर त्यांनी दिंडोरी उपविभागीय कार्यालयामध्ये मागितली आहे. त्या दृष्टीने पुढची कार्यवाही केली जाणार आहे.
दिलेल्या मुदतीमध्ये, भूसंपदनाबाबतीत हरकती नसल्यास शेतजमीन मालकासोबत जिल्हा प्रशासनाकडून थेट जमिनीचा व्यवहार केला जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिलेली आहे. बाह्य रिंग रोड प्रकल्प राबवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. शहरालगत असलेल्या गावांपासून या रोडच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. दिंडोरी तालुक्यापासून काही वेळेच्या अंतरावरच सिंहस्थ कुंभमेळा भरवला जाणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने या रिंग रोडला खूपच महत्त्व येणार आहे. 2027 पासून सिंहस्थ कुंभमेळा असणार आहे. त्या दृष्टीने सरकारकडून पाऊले उचलली जात आहेत.
advertisement
बाह्य रिंग रोडचा महत्वाकांक्षी प्रकल्प शहराच्या आजूबाजूला असणार्‍या 25 गावांतून रस्ता केला जाणार आहे. शहरालगत असणाऱ्या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची जिल्हा प्रशासनाला गरज आहे. त्यासाठीच आता जिल्हा प्रशासन मालकी गटासोबत वाटाघाटी करत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून जमीन मालकांना 25 टक्क्यांचा अधिकचा मोबदला देऊन खरेदीची तयारी केली जात आहे. यामध्ये दिंडोरी तालुक्यातील ढकांबे, मानोरी आणि वरवंडी गावातील अनेक गावकऱ्यांची जमीन यामध्ये जात आहे. बाह्य रिंग रोड प्रकल्पासाठी अनेक गावकऱ्यांचा भू संपादनासाठी विरोध आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासन तब्बल 36 हेक्टर जमीन संपादित करणार आहे.
advertisement
दरम्यान, अनेक गावकऱ्यांचा जरीही विरोध सुरू असला तरीही अनेक जमिनींची मालकी गटनिश्चिती होऊन मोजणी प्रक्रिया सुद्धा आता आटोपली आहे. 15 दिवसांच्या मुदतीमध्ये प्रशासनाकडे जमिनीच्या मालकी हक्कांबाबतचे पुरावे सादर करण्याचे आवाहन उपविभागिय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना केलेले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: नाशिकच्या गावांमधील बाह्य रिंग रोडचा विकास होणार, भूसंपादनासाठी किती दिवसांसाठी दिली मुदत?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement