advertisement

नवनीत राणांचे तिकिट कापलं, राज्यसभेच्या रेसबाहेर पडताच पहिली प्रतिक्रिया; स्टेटसची जोरदार चर्चा

Last Updated:

भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी दिली आहे. भा

News18
News18
मुंबई : भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या राज्यसभा उमेदवारांच्या यादीने राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. अपेक्षेप्रमाणे काही नावे निश्चित झाली असली, तरी काही संभाव्य दावेदारांच्या आशा धुळीस मिळाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या नवनीत राणा यांचे नाव यादीत नसल्याने राजकीय चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे.
राज्यसभेसाठी राणा यांना संधी मिळेल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र पक्षाने जाहीक केलेल्या यादीमध्ये माजी खासदार नवनीत राणा यांचा समावेश नाही. मात्र, नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते यांना उमेदवारी देत भाजपने सर्व चर्चांना पूर्ण विराम लागवा. माया ईवनाते यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली. त्याचबरोबर विनोद तावडे, रामदास आठवले आणि अन्य दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. या निर्णयानंतर संभाव्य दावेदारांमध्ये असलेल्या राणा यांच्या समर्थकांमध्ये नाराजीची भावना व्यक्त होत आहे.
advertisement

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसही चर्चेचा विषय  

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा यांनी एका व्हिडिओद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे,. 'संघर्ष करना मेरे लिए नई बात नही है, मै किसी भी मोड से नई शुरुवात कर सकती हू,” असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यातून उमेदवारी न मिळाल्याने त्या काहीशा भावनिक झालेल्या दिसल्या. दरम्यान, राणा यांनी ठेवलेले व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसही चर्चेचा विषय ठरले आहे. उमेदवारी हुकल्यानंतर हे स्टेटस ठेवल्याने या मागे काही वेगळे राजकीय संकेत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
advertisement

स्थानिक पातळीवर असंतोष वाढण्याची शक्यता

भाजपने राज्यसभा निवडणुकीत संघटनात्मक समतोल आणि सामाजिक प्रतिनिधित्व साधण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होत असले, तरी काही नावे वगळल्याने स्थानिक पातळीवर असंतोष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवनीत राणा यांच्यासारख्या आक्रमक आणि चर्चेत राहणाऱ्या नेत्या पुढील काळात कोणती राजकीय दिशा स्वीकारतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. संघर्षातून नव्याने उभे राहण्याचा त्यांचा दावा येत्या काळात कितपत साकार होतो, हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
advertisement

भाजपकडून सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न

भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठा, आदिवासी, ओबीसी आणि मागासवर्गीय समाजाला चारही उमेदवारांच्या माध्यमातून संधी देण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. सोबतच, यादीतून प्रादेशिक समतोल देखील राखण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचं दिसून येतंय. विदर्भ, मराठवाडा, कोकणातील उमेदवारांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नवनीत राणांचे तिकिट कापलं, राज्यसभेच्या रेसबाहेर पडताच पहिली प्रतिक्रिया; स्टेटसची जोरदार चर्चा
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement