कर्णानंतर दानशूर माणूस म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांच्यासारखा माणूसच पाहिला नाही, शरद पवारांच्या आमदाराकडून स्तुती
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अखिल भारतीय होलार समाज संघटनेने होलार समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी ४ ऑगस्ट रोजी माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे 'होलार समाज संकल्प मेळावा २०२५' संपन्न झाला.
विरेंद्र उत्पात, प्रतिनिधी, माळशिरस सोलापूर : मी माझ्या राजकीय कारकीर्दीत जय पराजयाच्या अनेक निवडणुका पाहिल्या, अनेक राज्यकर्ते पाहिले, मुख्यमंत्री पाहिले. पण माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा दानशूर माणूस मी पाहिला नाही, अशी स्तुतीसुमने राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर यांनी उधळली.
अखिल भारतीय होलार समाज संघटनेने होलार समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी ४ ऑगस्ट रोजी माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे 'होलार समाज संकल्प मेळावा २०२५' संपन्न झाला. या कार्यक्रमाला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह होलार समाज बांधव, संघटनेचे मान्यवर उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात जानकर यांनी एकनाथ शिंदे यांची तोंडभरून स्तुती केली.
advertisement
कर्णानंतर दानशूर माणूस म्हणजे एकनाथ शिंदे
राजकारणात एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणूस मी अद्यापपर्यंत पाहिला नाही. कर्णानंतर मी दुसरा दानशूर माणूस एकनाथ शिंदे यांच्या रूपाने पाहिला. मी ४० वर्षांपासून राजकारणात वावरतो मात्र असा दानशूर माणूस पाहिला नाही. मी दुसऱ्या पक्षात असलो तरी मी हे धाडसाने सांगतो, असे उत्तमराव जानकर म्हणाले.
माळशिरससाठी १०० मुलं आणि मुलींसाठी वसतिगृह मंजूर आहे. मात्र त्यासाठी जागा उपलब्ध व्हावी अशी समाजाची मागणी आहे. गावात घरकुलांसाठी होलार समाजाला जागा मिळावी, होलार समाजाच्या महामंडळासाठी १०० कोटींचा निधी मिळावा, अशा प्रमुख मागण्या होलार समाज बांधवांनी मेळावाच्या निमित्ताने सरकारकडे केल्या.
advertisement
कोण आहेत उत्तमराव जानकर?
उत्तमराव जानकर हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत
माळशिरस विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २०२४ साली विधानसभा निवडणूक जिंकली
देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू युवा नेते राम सातपुते यांना जानकर यांनी पराभूत केले
मारकडवाडीमधील ईव्हीएम आंदोलनाने उत्तमराव जानकर यांना देशभरात प्रसिद्धी मिळाली
राजधानी नवी दिल्लीत आंदोलनाची घोषणा करून मारकडवाडीत शरद पवार यांची सभा त्यांनी घेतली
advertisement
या सभेतून ईव्हीएम हटाओ अशी देशव्यापी हाक दिली गेली, तसेच ईव्हीएमसाठी आमदारकी देखील पणाला लावण्याची तयारी राम सातपुते यांनी दाखवली.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
August 04, 2025 8:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कर्णानंतर दानशूर माणूस म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांच्यासारखा माणूसच पाहिला नाही, शरद पवारांच्या आमदाराकडून स्तुती