'माझ्या आईशी पळून लग्न केलं, तुझ्यामुळे...' संतापलेल्या लेकाने सख्ख्या काकाला संपवलं, नागपूर हादरलं

Last Updated:

संतापाच्या भरात कुणालने काकावर धारदार शस्त्राने हल्ला केला, या हल्ल्यात काका गंभीर जखमी झाला.

News18
News18
नागपूर :   कौटुंबिक वाद आणि नातेसंबंधातील गुंतागुंत यामुळे पुतण्याने स्वतःच्या काकाचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपूरमधील पारडी तालुक्यात घडली आहे. आरोपी कुणाल कुंभारे (वय २२) याने आपल्या काका गोमा कुंभारे यांचा खून केल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुणालच्या आईने काही वर्षांपूर्वी स्वतःच्या दिराशी म्हणजेच पतीच्या भावाशी म्हणजे गोमा कुंभारे यांच्याशी पळून जाऊन लग्न केले होते. या घटनेनंतर घरात कायमचा कलह सुरू झाला. आईच्या या निर्णयामुळे कुणालच्या मनात प्रचंड संताप निर्माण झाला होता. स्वतःच्या काकाशीच आईने विवाह केल्याने समाजात अपमान झाल्याची भावना त्याच्या मनात होती. त्यामुळे तो आपल्या वडिलांसोबत राहत होता, तर आई आणि काका दुसरीकडे राहत होते.
advertisement

काका-पुतण्यामध्ये अनेकदा वाद

काकांनी आपल्या आईला पळवून नेल्यामुळे आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची भावना आरोपीच्या मनात घर करुन बसली होती. त्यामुळे काका-पुतण्यामध्ये अनेकदा वाद झाले होते. घरातील वातावरण सतत तणावपूर्ण राहायचं. कुणालने आपल्या काकाला अनेक वेळा 'तुला पाहून घेईन अशी धमकी दिल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.

काकावर धारदार शस्त्राने केला हल्ला 

advertisement
अखेर बुधवारी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. संतापाच्या भरात कुणालने काकावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गोमा कुंभारे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी अवस्थेतील गोमा यांना भवानीनगर रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर आरोपी कुणाल आणि त्याचा मित्र घटनास्थळावरून पसार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे असून पुढील तपास सुरू केला आहे.
advertisement

परिसरात एकच खळबळ

या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका नात्याने दुसऱ्या नात्याचा जीव घेतल्याची घटना स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. पोलिसांनी सांगितले की, कौटुंबिक वाद आणि नातेसंबंधातील गुंतागुंत हे या हत्येमागील प्रमुख कारण असून, पुढील तपास सुरू आहे. नातेसंबंधातील गुंतागुंत कशी जीवघेणी ठरू शकते याचे हे उदाहरण ठरले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'माझ्या आईशी पळून लग्न केलं, तुझ्यामुळे...' संतापलेल्या लेकाने सख्ख्या काकाला संपवलं, नागपूर हादरलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement