Dahihandi 2025: दहीहंडीच्या दिवशी काळाचा घाला, मुंबईत एकाचा मृत्यू तर 116 गोविंदा जखमी

Last Updated:

Dahihandi 2025: मुंबईत दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. दादर, घाटकोपर, वरळी, लालबाग, परळ, गिरगाव, अंधेरी, बोरिवली, दहिसर, भायखळा, भांडूप, विक्रोळी, मुलुंड, कुर्ला आदी विभागात दहीहंडी फोडण्याठी गोविंदाची गर्दी जमते.

Dahihandi 2025: दहीहंडीच्या दिवशी काळाचा घाला, मुंबईत एकाचा मृत्यू तर 116 गोविंदा जखमी
Dahihandi 2025: दहीहंडीच्या दिवशी काळाचा घाला, मुंबईत एकाचा मृत्यू तर 116 गोविंदा जखमी
मुंबई: जन्माष्टमीनिमित्त काल (16 ऑगस्ट) महाराष्ट्रभर दहीहंडी उत्सव साजरा झाला. मुंबईतील दहीहंडी उत्सवाची विशेष चर्चा झाली. गोविंदा पथकांनी विक्रमी थर लावत नागरिकांचं मनोरंजन केलं. मात्र, काही अनुचित घटनांमुळे या उत्सवाला गालबोट लागलं आहे. यावर्षीच्या दहीहंडी उत्सवादरम्यान एका गोविंदाचा मृत्यू झाला तर 116 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द येथे दहीहंडीची दोरी बांधताना घरावरून पडून एका गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जगमोहन चौधरी असं 32 वर्षीय मृत गोविंदाचं नाव आहे. चौधरी हे महाराष्ट्र नगर येथे बाळ गोविंदा पथकातील गोविंदा होते. दहीहंडीच्या दिवशी ते एक मजली घरावर लोखंडी ग्रीलला दहीहंडीची दोरी बांधण्यासाठी चढले होते. दोरी बांधत असतानाच त्यांचा तोल गेला व ते घरावरून खाली पडले. गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ पालिकेच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी चौधरींना मृत घोषित केलं.
advertisement
शेकडो गोविंदा जखमी
मुंबईत दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. दादर, घाटकोपर, वरळी, लालबाग, परळ, गिरगाव, अंधेरी, बोरिवली, दहिसर, भायखळा, भांडूप, विक्रोळी, मुलुंड, कुर्ला आदी विभागात दहीहंडी फोडण्याठी गोविंदाची गर्दी जमते. यावर्षी शहरातील विविध ठिकाणी एकूण 116 गोविंदा जखमी झाले.
advertisement
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, 116 जखमी गोविंदांपैकी 43 जखमी गोविंदांवर विविध रुग्णालयात उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उर्वरित 32 जखमी गोविंदावर अद्याप उपचार सुरू आहेत. श्रेयस चाळके आणि आर्यन यादव या दोन 9वर्षांच्या गोविंदांची प्रकृती चिंताजनक आहे. श्रेयसवर जी. टी. रुग्णालयात तर आर्यनवर कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dahihandi 2025: दहीहंडीच्या दिवशी काळाचा घाला, मुंबईत एकाचा मृत्यू तर 116 गोविंदा जखमी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement