Dahi Handi 2025: खालुबाजा आणि सनई वादन, रायगडच्या गिरणे गावात पारंपरिक गोपाळकाला उत्सव, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Dahi Handi 2025: इथे डीजे किंवा गाणी नसतात. त्याऐवजी खालुबाजा आणि सनईच्या वादनात हा सण साजरा केला जातो.
मुंबई: श्रावण महिन्यातील मोठ्या सणांपैकी एक म्हणजे गोकुळाष्टमी. हा सण आपण दहीहंडी किंवा दहीकाला म्हणून ओळखतो. संपूर्ण देशभर हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. ठिकठिकाणी तरुण मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडतात. कोकणातील रायगड जिल्ह्यातल्या तळा तालुक्यातील गिरणे गावात मात्र आजही हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. इथे डीजे किंवा गाणी नसतात. त्याऐवजी खालुबाजा आणि सनईच्या वादनात हा सण साजरा केला जातो.
गावातली प्रथा अशी आहे की, रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्म झाल्यावर पहिली दहीहंडी फोडली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून गावातील 200 ते 300 तरुण एकत्र येऊन दहीहंडीचा उत्सव सुरू करतात. देवळात नारळ अर्पण करून आणि मनातील इच्छा बोलून हा सोहळा सुरू होतो.
advertisement
महिलादेखील यात भाग घेतात. त्या गावभर फिरणाऱ्या गोविंदांवर पाणी ओतून त्यांना भिजवतात. तरुण मंडळी पारंपरिक गाणी गातात, सनई-खालुबाजाच्या तालावर नाचत-गात दहीहंडी फोडतात. नंतर सर्वांनी मिळून दही आणि पोह्यांचा प्रसाद घेतला जातो. गावात हा सण गेल्या 17-18 पिढ्यांपासून याच पद्धतीने साजरा केला जातो. त्यामुळे गिरणे गावाला तळा तालुक्यातील सर्वात मोठा गोपाळकाला उत्सव म्हणून ओळख मिळाली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 16, 2025 6:09 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Dahi Handi 2025: खालुबाजा आणि सनई वादन, रायगडच्या गिरणे गावात पारंपरिक गोपाळकाला उत्सव, Video

