Social Work: 14 देश, 250 जिल्हे आणि 37 वर्षांची सेवा, पुण्यातील संस्थेचं कौतुकास्पद कार्य
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Social Work: मुस्लिम समाजातील 600 हून अधिक सभासदांनी मृत्यूनंतर अवयवदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. हा उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला आहे.
पुणे: पुण्यातील 'वर्क चॅरिटेबल ट्रस्ट' ही संस्था 1988 पासून समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि सांप्रदायिक ऐक्यासाठी कार्यरत आहे. 'वर्क फॉर कम्पॅशन संघटने'च्या अंतर्गत असलेली ही संस्था गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून 14 देश आणि 250 जिल्ह्यांमध्ये सक्रिय आहे. या संस्थेच्या माध्यमातून समाज हिताचे विविध उपक्रम राबवले जात आहेत.
भारताला पुन्हा विश्वगुरू बनवण्यासाठी जनजागृती
समाजाचे कल्याण, पर्यावरण संवर्धन, सर्व धर्मीयांमध्ये ऐक्य निर्माण करणे, शांततेचा प्रसार करणे आणि भारताला पुन्हा विश्वगुरू बनवण्यासाठी जनजागृती करणे, ही या संस्थेची उद्दिष्ट्ये आहेत. जात-पात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन 'माणुसकीचा झेंडा उंचावणे' हेच या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे.
अवयवदानाचा संकल्प
ऑगस्ट महिन्यात संस्थेचा 37वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्त विशेष अवयवदान संकल्प अभियान राबवण्यात आलं. या मोहिमेत मुस्लिम समाजातील 600 हून अधिक सभासदांनी मृत्यूनंतर अवयवदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. हा उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला आहे.
advertisement
ससूनमध्ये मोफत नाश्ता ते रोड सेफ्टी मोहीम
सामाजिक कल्याणाबरोबरच वर्क चॅरिटेबल ट्रस्ट अनेक लोककल्याणकारी आणि पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबवत आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात दर गुरुवारी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत नाश्त्याची सोय केली जाते. तसेच वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, किल्ले सफाई अशा पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांद्वारे निसर्गरक्षणाचा संदेश दिला जातो. शहरातील विविध सिग्नलवर रोड सेफ्टी जनजागृती मोहिमा राबवून वाहतूक नियमांचं पालन करण्यासाठी जनजागृती केली जाते. 37 वर्षांत संस्थेने असे अनेक उपक्रम राबवले आहेत.
advertisement
संस्थेचे प्रमुख पदाधिकारी
view commentsराष्ट्रीय अध्यक्ष अल्लामा सय्यद अब्दुल्ला तारिक, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मुहम्मद अवैस, पुणे शहर अध्यक्ष वसीम शेख, महाराष्ट्र महिला गट अध्यक्षा फौझिया खाटीक आणि पुणे शहर महिला गट अध्यक्षा सलमा पठाण यांच्या नेतृत्वाखाली संस्था सामाजिक कल्याण, पर्यावरण संवर्धन आणि सामुदायिक ऐक्यासाठीचे सातत्याने उपक्रम राबवत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 16, 2025 3:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Social Work: 14 देश, 250 जिल्हे आणि 37 वर्षांची सेवा, पुण्यातील संस्थेचं कौतुकास्पद कार्य

