Pune Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोत महिलाराज! 100 पायलट्सची होणार भरती
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Pune Metro: पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने (पीआयटीसीएमआरएल) एका फ्रेंच कंपनीसोबत करार केला आहे.
पुणे: मुंबईप्रमाणे पुण्यात देखील मेट्रोचं जाळं वेगाने पसरत आहे. येत्या काही महिन्यात आयटी हब असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो धावणार आहे. 'मेट्रो लाईन 3' असं नाव असलेली ही मेट्रो पुणे शहरातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. हा मार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मेट्रोच्या कामात आता एका परदेशी कंपनीची एंट्री झाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने (पीआयटीसीएमआरएल) एका फ्रेंच कंपनीसोबत करार केला आहे. पॅरिसस्थित 'केओलिस' ही फ्रेंच कंपनी पुणे मेट्रोच्या हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेचं व्यवस्थापन करणार आहे. अल्स्टॉम कंपनीच्या मेट्रो गाड्यांची देखभाल आणि 23 स्टेशन्सवरील तिकीट व्यवस्थेची जबाबदारी केओलिस कंपनीकडे असेल.
advertisement
सर्व महिला मेट्रोपायलट
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कॉरिडॉरवर सर्व महिला मेट्रो पायलट ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत कंपनी म्हणाली, "हा भारतातील एक अभूतपूर्व उपक्रम आहे. पुण्यातील मेट्रो लाईन 3 वरील सर्व गाड्या महिला पायलट चालवतील. यासाठी सुमारे 100 महिला पायलट्सची भरती केली जाईल. त्यांना प्रशिक्षण देण्याची योजना तयार केली जात आहे."
advertisement
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी अशा पीपीपी मॉडेलवर हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो विकसिती केली जात आहे. एकूण 23 किलोमीटर लांबीच्या या मेट्रो मार्गावर 23 स्टेशन्स असतील. या मार्गावर ट्रायल रन आधीच पूर्ण झालं असून मार्च 2026 पर्यंत प्रत्यक्ष सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकल्पाचं सुमारे 87 टक्के बांधकाम पूर्ण झालेलं आहे. सर्व काम वेळेत झाल्यास पुणेकरांना 2026 पासून मेट्रोनं प्रवास करता येईल.
advertisement
वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कॉरिडॉरचा अनेकांना फायदा होणार आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो प्रवाशांना मेट्रो मार्गिकेमुळे सहज प्रवास करता येईल. हिंजवडी आणि आसपासच्या परिसरात आयटी पार्कमध्ये अनेकजण कामाच्या निमित्ताने राहतात. आयटी पार्कमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकी कोंडी होते. हा त्रास कमी होण्यासाठी मेट्रोचा पर्याय उपलब्ध केला जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 19, 2025 3:43 PM IST