पालघरच्या समुद्रात सापडले 3 संशयास्पद कंटेनर, नेमकं कुणाचे समोर आली मोठी अपडेट

Last Updated:

पालघरच्या समुद्रकिनारी ओमानमधील दुर्घटनाग्रस्त जहाजाचे तीन ऑइल कंटेनर सापडले. स्थानिक मच्छिमारांमध्ये भीती, प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.

News18
News18
राहुल पाटील, प्रतिनिधी पालघर: अचानक समुद्रकिनाऱ्याजवळ काहीतरी दिसलं, काय आहे याकडे जरा संशयानेच पाहिल्यावर समजलं तीन कंटेनर वाहून आले आहेत. हे कंटेनर कसले आहेत त्यामध्ये नेमकं काय आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. कंटेनरच्या कडांवर छोटे शिंपल्या लागलेल्या होत्या. त्यावर हे खोल समुद्रातून कुठूनतरी आले असावेत असा प्राथमिक अंदाज होता. या संशयास्पद तीन कंटेनरबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
पालघर जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर काल सापडलेले तीन मोठे कंटेनर ओमान येथे गेल्या महिन्यात दुर्घटनाग्रस्त झालेल्या जहाजाचे असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्यात ओमानमध्ये एक मालवाहू जहाज दुर्घटनाग्रस्त झाले होते, ज्यात साडेतीनशे कंटेनर होते. त्यापैकी 302 कंटेनर शोधण्यात ओमानला यश आले होते.
advertisement
या दुर्घटनेनंतर बेपत्ता असलेल्या 48 कंटेनरपैकी 25 कंटेनर गुजरातच्या किनाऱ्यावर तर तीन कंटेनर पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले असल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे. हे कंटेनर ऑइलची वाहतूक करणाऱ्या जहाजाचे होते. जहाज दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर कंटेनर देखील समुद्रात विखुरले गेले. त्यातील काही कंटेनर अद्यापही सापडले नाहीत.
advertisement
या कंटेनरमधील ऑइल मानवी शरीरासाठी धोकादायक नसले तरी, ते समुद्रात पसरल्यास माशांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. या कंटेनरमुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे, मात्र पोलीस आणि प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पालघरच्या समुद्रात सापडले 3 संशयास्पद कंटेनर, नेमकं कुणाचे समोर आली मोठी अपडेट
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement