चाकूचा धाक दाखवून घरात घुसला, अकोल्यात 16 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, कुटुंब गणेश विसर्जनाला जाताच साधला डाव
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Akola: ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी अकोला शहरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
कुंदन जाधव, प्रतिनिधी अकोला: ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी अकोला शहरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गणपती विसर्जनामुळे पीडित मुलीचं कुटुंब घराबाहेर गेलं होतं. यावेळी मुलगी एकटीच घरात होती. हीच बाब हेरून घरात घुसलेल्या एका आरोपीने चाकुचा धाक दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. अत्याचाराची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आगे.
तौहिद समीर बैद्य असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. अत्याचार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथकं रवाना केली आहेत. आरोपीचा सध्या शोध सुरू आहेत. गणेश विसर्जनाच्या दिवशी अशाप्रकारे एका मुलीवर घरात घुसून अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (७ सप्टेंबर) दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय गणपती विसर्जनासाठी बाहेर गेले होते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपी तौहिदने मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यासाठी एक विशेष पथक तयार केले आहे.
advertisement
आरोपी तौहिद बैद्य याचा गुन्हेगारी इतिहास असून, त्याने यापूर्वीही अनेक गुन्हे केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत असून, त्याला लवकरच बेड्या ठोकल्या जातील, असे पोलिसांनी सांगितले आहे.
Location :
Akola,Maharashtra
First Published :
September 08, 2025 10:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अकोला/
चाकूचा धाक दाखवून घरात घुसला, अकोल्यात 16 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, कुटुंब गणेश विसर्जनाला जाताच साधला डाव