Pankaja Munde : पंकजा मुंडे इज बॅक! भाजपकडून विधानपरिषदेचं तिकीट जाहीर

Last Updated:

लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये पराभवाचा धक्का बसलेल्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचं तिकिट देण्यात आलं आहे.

पंकजा मुंडे
पंकजा मुंडे
मुंबई : भाजपने महाराष्ट्रात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवाराची यादी जाहीर केलीय. यामध्ये लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये पराभवाचा धक्का बसलेल्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचं तिकिट देण्यात आलं आहे. याशिवाय सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे यांनाही भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिलीय.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मविआचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला. यानंतर आता भाजपने पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केलीय. लवकरच राज्यातील विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानपरिषदेचं तिकिट दिल्यानंतर आता पंकजा मुंडे यांची मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देण्याची शक्यता आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १२ जुलैनंतर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना बीडमधून तिकिट दिलं होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. त्याआधी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीतही पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला होता. तेव्हापासून पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सुरू होती. अखेर त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pankaja Munde : पंकजा मुंडे इज बॅक! भाजपकडून विधानपरिषदेचं तिकीट जाहीर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement