advertisement

Nashik News: नाशिककरांसाठी खुशखबर! अमृत भारत एक्सप्रेस आता नाशिक रोडवरही थांबणार; Time Table आलं

Last Updated:

पनवेल- अलीपुरद्वार धावणाऱ्या ह्या अमृत भारत एक्सप्रेसच्या थांब्यामध्ये आणखी एका स्थानकाचा समावेश होणार आहे. येत्या 23 फेब्रुवारीपासून ही अमृत भारत एक्सप्रेस थांबणार आहे.

Amrut Bharat Express: पनवेलहून आजपासून सुटणार नवी अमृत भारत एक्सप्रेस, 2308 km अंतरासाठी फक्त इतकं भाडं; Timetableसह सर्व डिटेल्स
Amrut Bharat Express: पनवेलहून आजपासून सुटणार नवी अमृत भारत एक्सप्रेस, 2308 km अंतरासाठी फक्त इतकं भाडं; Timetableसह सर्व डिटेल्स
नाशिक: नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे. पनवेल- अलीपुरद्वार धावणाऱ्या ह्या अमृत भारत एक्सप्रेसच्या थांब्यामध्ये आणखी एका स्थानकाचा समावेश होणार आहे. येत्या 23 फेब्रुवारीपासून ही अमृत भारत एक्सप्रेस थांबणार आहे. नाशिक रोड स्थानकावर येत्या 23 फेब्रुवारीपासून ही एक्सप्रेस थांबणार आहे. साप्ताहिक धावणारी ही ट्रेन प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. सोमवारी सकाळी पनवेल स्थानकावरून सुटणारी ही ट्रेन बुधवारी दुपारी अलीपूरद्वार स्थानकावर पोहोचेल. तर, अलीपूरद्वार स्थानकावरून गुरूवारी पहाटे ही ट्रेन सुटेल जी पनवेल स्थानकावर शनिवारी पहाटे पोहोचेल. ट्रेनच्या थांब्यामध्ये आणखी एक नवीन स्थानक दाखल झाल्यामुळे नाशिककर या ट्रेनने सहजतेने प्रवास करू शकणार आहेत.
पनवेल- अलीपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेस 23 फेब्रुवारीपासून सोमवारी सकाळी 11.50 वाजता पनवेल स्थानकावरून सुटेल. तर नाशिक रोड स्थानकावर ही ट्रेन दुपारच्या वेळी पोहोचेल. तर, अलीपूरद्वार स्थानकावर बुधवारी दुपारी 01.50 वाजता पोहोचेल. 26 फेब्रुवारीपासून अलीपूरद्वार स्थानकावरून गुरूवारी पहाटे 04.45 वाजता सुटेल, तर पनवेल स्थानकावर शनिवारी सकाळी 05.30 वाजता पोहोचेल. पनवेल ते नाशिक दरम्यानचे भाडे किती पर्यंत असेल? याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. या ट्रेनसाठी भारतीय रेल्वे प्रति 1000 किलोमीटरचे सुमारे 500 रूपयापर्यंतचे भाडे घेत आहे. आपल्या प्रवासाप्रमाणे हे भाडे असेल. पण सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल, असे हे भाडे असण्याची शक्यता आहे.
advertisement
पनवेल- अलीपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेसचे थांबे, हासिमारा, बिन्नागुडी, सिलिगुडी, न्यू जलपाईगुडी जंक्शन, अलुबारी रोड जंक्शन, किशनगंज, बरसोई जंक्शन, कटिहार, नौगाचिया, मानसी जंक्शन, खगरिया जंक्शन, हसनपूर रोड, समस्तीपूर जंक्शन, मुझफ्फरपूर जंक्शन, हाजीपूर जंक्शन, सोनपूर, पाटलीपुत्र जंक्शन, दानापूर, अरा, बुक्सर, पंडीत दिनदयाल उपाध्याय जंक्शन, मिर्झापूर, मेजा रोड, प्रयागराज छेओकी, बारगढ, माणिकपूर, सतना जंक्शन, कटनी जंक्शन, जबलपूर, पिपरिया, इटारसी जंक्शन, भुसावळ जंक्शन, जळगाव जंक्शन, नाशिक रोड आणि कल्याण अशा मुख्य स्थानकांवर असणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik News: नाशिककरांसाठी खुशखबर! अमृत भारत एक्सप्रेस आता नाशिक रोडवरही थांबणार; Time Table आलं
Next Article
advertisement
भारतातील 5 सर्वात महागडे टोल नाके; इथून गाडी नेली तर खिसा रिकामाच समजा; टोलचे दर आयुष्यभर विसरणार नाही
भारतातील 5 सर्वात महागडे टोल नाके; इथून गाडी नेली तर खिसा रिकामाच समजा
  • देशातील 5 महागडे टोल पॉइंट

  • 2 टोल नाके महाराष्ट्रात

  • टोलचे दर ऐकून फुटेल घाम

View All
advertisement