फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण, अंबादास दानवेंनी रणजीत निंबाळकरांचं घेतलं नाव, केले गंभीर आरोप
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी भाजपचे माजी खासदार रणजीत निंबाळकर यांचं नाव घेतलं आहे.
साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने शुक्रवारी आत्महत्या केली. त्यांनी हातावर सुसाईड नोट लिहून आयुष्याचा शेवट केला. हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत तिने आपल्यावर पीएसआय गोपाल बदने याने चार वेळा अत्याचार केला. आणि प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. त्यामुळे मी जीव देत आहे, असं लिहून महिला डॉक्टरने आयुष्याचा शेवट केला.
यानंतर आता या प्रकरणात संबंधित महिला डॉक्टरवर वैद्यकीय रिपोर्ट बदलण्यासाठी राजकीय दबाव टाकला जात होता. यासाठी फलटणमधील एका खासदाराचे दोन पीए सातत्याने महिला डॉक्टरवर दबाव टाकत होते, याबाबतची माहिती एका पत्रातून समोर आली आहे. या सगळ्या घडामोडीनंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी माढ्याचे माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, त्यांचा भाऊ अभिजीत निंबाळकर आणि फलटणचे आमदार सचिन कांबळे हे अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात आणि चुकीचे कामं करून घेतात, असा आरोप केला आहे. दानवे यांच्या आरोपानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.
advertisement
अंबादास दानवे नक्की काय म्हणाले?
अंबादास दानवे म्हणाले की, "फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील युवतीवर राजकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांचा दबाव होता. महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकाचा त्यामध्ये समावेश आहे. त्याची 15 दिवसांपूर्वी नंदुरबारला बदली झाली. त्याच्याकडे सदर डॉक्टर तरुणीने तक्रार अर्ज केला होता. मात्र त्याने त्या तक्रारीला केराची टोपली दाखवली. त्याच्यावर तत्काळ निलंबन कारवाई करा. त्याने त्याचवेळी सदर अर्जाची दखल घेतली असती तर आज तिचा जीव वाचला असता."
advertisement
माजी खासदाराचा भाऊ अभिजीत निंबाळकर हा त्या ठिकाणी यंत्रणा चालवतो. अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे, त्यांना चुकीची कामे करायला लावणे हे धंदे करतो. त्याला साथ राष्ट्रवादीच्या सचिन कांबळे पाटील या आमदाराची आहे. त्या निंबाळकरचं अधिकारांच्या दालनात काय काम असतं? या तिघांवर कारवाई करा. हे तिघे त्याठिकाणी यंत्रणा चालवत होते आणि चुकीची कामे करत होते असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
advertisement
सचिन कांबळे पाटील हे अजित पवारांचे आमदार नाहीत, ते नावाला राष्ट्रवादीत आहेत. ते सगळं काम भाजपचं करतात असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला. ते म्हणाले की, "आमदार सचिन कांबळे पाटील, माजी खासदार रणजित निंबाळकर आणि त्यांचा भाऊ अभिजीत निंबाळकर हे अधिकाऱ्यावर दबाव टाकतात आणि चुकीची कामे करायला लावतात. पोस्ट मार्टम सर्टिफिकेट त्यांच्या सोयीने द्या, चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करा, राजकीय कार्यकर्त्यांवर चुकीची कलमे लावा असले उद्योग करत होते."
view commentsLocation :
Phaltan,Satara,Maharashtra
First Published :
October 25, 2025 6:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण, अंबादास दानवेंनी रणजीत निंबाळकरांचं घेतलं नाव, केले गंभीर आरोप


