PM Modi In Nagpur : संघ हा महान अक्षय वटवृक्ष, रेशीमबागेत पंतप्रधान मोदींचे कौतुकोद्गार

Last Updated:

PM Modi In Nagpur : स्वातंत्र्यपूर्वी डॉ. हेडगेवार गुरुजींनी राष्ट्रीय चेतना वाढविली. या चेतनेतून लावण्यात आलेले वृक्ष आज वटवृक्ष झाले असल्याचे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

News18
News18
नागपूर : स्वातंत्र्यपूर्वी डॉ. हेडगेवार गुरुजींनी राष्ट्रीय चेतना वाढविली. या चेतनेतून लावण्यात आलेले वृक्ष आज वटवृक्ष झाले असल्याचे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. पंतप्रधान मोदी आज नागपूरात संघ मु्ख्यालयात आले होते. यावेळी माधव नेत्रालय रुग्णालयाचे भूमिपूजन त्यांचे हस्ते पार पडले. त्यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी बोलत होते. भारत आता गुलामीच्या मानसिकेतून बाहेर पडत असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान झाल्यानंतर जवळपास 11 वर्षांनी पंतप्रधान मोदी यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली. संघ मुख्यालयात जाणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. पंतप्रधान मोदी हे संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत. संघात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर भाजपात त्यांनी संघाच्या सूचनेवर संघटनात्मक काम करण्यास सुरुवात केली.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वयंसेवकांवर कौतुकांचा वर्षाव केला. शंभर वर्ष पूर्वीजे वटवृक्ष निर्माण झाले होते, ते आज विशाल स्वरूपात सर्वांसमोर आहे. आदर्श आणि सिद्धांत मुळे हे वटवृक्ष टिकले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही असाच एक अविरत चालणारा यज्ञ आहे. जो बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करत आहे. बाह्यदृष्टी म्हणजे माधव नेत्रालय सारखे उपक्रम आहे. तर आंतरिक दृष्टी म्हणजे संघ सेवा कार्याचा पर्याय बनला आहे. हे सेवा संस्कार, ही साधना प्रत्येक स्वयंसेवकाचा प्राणवायू असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
advertisement
आपल्यावर एवढे परकीय हल्ले झाले, आपली संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न झाले, तरी भारतीय संस्कृतीची चेतना मिटली नाही. कारण ही चेतना जागृत ठेवणारे अनेक आंदोलन भारतात होत राहिले आहे. त्यापैकी एक भक्ती आंदोलनही आहे. यात अनेक संतांनी आपले योगदान दिले. स्वामी विवेकानंदांनी निराश झालेल्या समाजाला जागे करून आशेचा संचार केला. गुलामगिरीच्या काळात डॉ. हेडगेवार यांनी नवीन विचार दिला. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एका महान वटवृक्षाप्रमाणे जगासमोर उभा आहे. हा केवळ एक सामान्य वृक्ष नसून, भारताच्या अमर संस्कृतीचा अक्षयवट असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
PM Modi In Nagpur : संघ हा महान अक्षय वटवृक्ष, रेशीमबागेत पंतप्रधान मोदींचे कौतुकोद्गार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement