...तर परिणाम भोगावे लागतील, परभणीच्या घटनेवर प्रकाश आंबेडकर यांचा संताप

Last Updated:

Parbhani Bandh: परभणीत मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली.

प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर
परभणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे माथेफिरूने नुकसान केल्याने शहरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. गुरुवारी आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या परभणी जिल्हा बंद आंदोलनाला हिंसक वळण लागले. या घटनेसंबंधी आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
परभणीत मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येत्या चोवीस तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. तसेच ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे.

दलित अस्मितेच्या प्रतिकाची तोडफोड ही पहिलीच घटना नाही

advertisement
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून एका समाजकंटकाला अटक केली आहे. तरीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा, असे आवाहन आंबेडकर यांनी आंबेडकरी समाजाला केले.
advertisement
advertisement

परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण

परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. तिथे भारतीय संविधानाची प्रतिकृती करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास एका अज्ञाताने संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे काही तासांतच परभणी शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. संतप्त झालेल्या आंबेडकरी अनुयायांनी मंगळवारी संध्याकाळी रास्ता रोको, रेल रोको आंदोलन केले. तर, आज परभणी बंदची हाक देण्यात आली. या बंदला हिंसक वळण लागले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
...तर परिणाम भोगावे लागतील, परभणीच्या घटनेवर प्रकाश आंबेडकर यांचा संताप
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement