Prashant Koratkar : आवाज मॉर्फचा दावा, कोरटकरने मोबाईल जमा केला, पोलिसांना बसला धक्का! काय झालं नेमकं
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Prashant Koratkar : कोरटकरच्या अंतरिम जामिनाविरोधात कोल्हापूर पोलिसांनी हायकोर्टात धाव घेतली. आजच्या सुनावणीत धक्कादायक गोष्टी समोर आल्या.
मुंबई : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने प्रशांत कोरटकर चांगलाच अडचणीत सापडला आहे. प्रशांत कोरटकरच्या जामिनाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोरटकरच्या अंतरिम जामिनाविरोधात कोल्हापूर पोलिसांनी हायकोर्टात धाव घेतली. आजच्या सुनावणीत धक्कादायक गोष्टी समोर आल्या.
प्रशांत कोरटकरच्या जामिनाविरोधात मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने आपला निकाल दिला. प्रशांत कोरटकर तपासाला सहकार्य करत नसल्याने राज्य सरकारने उच्च न्यायालयात धाव घेतली. आतापर्यंत एकदाही तपास अधिकाऱ्यासमोर हजर न झाल्याने तपासात अडचणी येत असल्याचे राज्य सरकारच्यावतीने सांगण्यात आले. कोल्हापूर सत्र न्यायलयात आज सुनावणी होणार आहे. यावेळी जिल्हा न्यायालयाने राज्य सरकारची बाजू ऐकून घ्यावे असे निर्देश दिले. त्याशिवाय, कोल्हापूर सत्र न्यायलयाने दिलेली निरीक्षणे काढण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले. प्रशांत कोरटकरचा मोबाईल हॅक झाल्याचं कोल्हापूर सत्र न्यायलयाने निरीक्षण नोंदवले होते. आता हायकोर्टाने हे निर्देश दिल्याने कोरटकरला झटका बसला आहे.
advertisement
प्रशांत कोरटकरने काय म्हटले होते?
प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देताना चक्क शिवछत्रपतींबाबतच वादग्रस्त वक्तव्य केले. कोरटकर थांबला नाही तर त्याने त्यापुढे जात ” तुम्ही ब्राह्मण मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली आहात” असे धक्कादायक विधान करत धमकी दिली. कोरटकरच्या या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. कोरटकरच्या धमकीची क्लिप व्हायरल झाल्यानंतर आपला आवाज मॉर्फ केला असल्याचा दावा कोरटकरने केला. कोल्हापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर नागपूरमधून कोरटकर भूमिगत झाला.
advertisement
कोरटकरने मोबाईल जमा केला पण....
कोर्टाच्या आदेशानंतर कोरटकरने आपला मोबाईल पोलिसांकडे जमा केला. मात्र हा मोबाईल जमा करताना त्याने स्वत: जमा अपेक्षित करणे अपेक्षित होते. कोरटकरने आपल्या पत्नीच्या मार्फत हा मोबाईल जमा केला. पण, प्रशांत कोरटकरने मोबाईल जमा करताना सगळा डेटाच नष्ट केला. आपला मोबाईल फॉर्मेट करून प्रशांत कोरटकरने आपला मोबाईल जमा केला. आपला आवाज मॉर्फ करून इंद्रजित सावंत यांना फोन केल्याची तक्रार कोरटकरने केली होती. त्यानंतर आता मोबाईल फॉर्मेट करून त्याने एकप्रकारे पुरावाच नष्ट केल्याचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2025 12:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Prashant Koratkar : आवाज मॉर्फचा दावा, कोरटकरने मोबाईल जमा केला, पोलिसांना बसला धक्का! काय झालं नेमकं










