Local Body Election : आयारामांचा पत्ता कट, थेट पेरुवालीला तिकिट, कोण आहे अजितदादांची चर्चेतील उमेदवार?

Last Updated:

Pune Lonavala Local Body Election: राजकारणाचा गंध ही नसलेल्या जगताप कुटुंबासमोर आता प्रचाराच्या रणधुमाळीला सामोरं जाण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

आयारामांचा पत्ता कट, थेट पेरुवालीला तिकिट, कोण आहे अजितदादांची चर्चेतील उमेदवार?
आयारामांचा पत्ता कट, थेट पेरुवालीला तिकिट, कोण आहे अजितदादांची चर्चेतील उमेदवार?
अनिस शेख/ गणेश दुडूम, प्रतिनिधी, पुणे: राज्यातील राजकारणाने अनेक मर्यादा ओलांडलेल्या आहेत. निवडणूक प्रचारात आता फक्त आश्वासनांचा महापूर येत नाही तर त्याच्या सोबत 'लक्ष्मी दर्शन'ही काहीजण करतात. अप्रत्यक्षपणे बडे नेते याचे समर्थन करणारे वक्तव्यही करतात. निवडणुकीत वाढलेल्या खर्चामुळे लोकशाहीत सामान्यांना निवडणूक लढवणे अशक्य झाल्याचे म्हटले जाते. मात्र, अशात लोणावळ्यात मात्र एक सकारात्मक चित्र पहायला मिळतंय. फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिलीयं. त्यामुळं आदिवासी समाजातील या कुटुंबाचं भाग्य उजळलंय. पण राजकारणाचा गंध ही नसलेल्या जगताप कुटुंबासमोर आता प्रचाराच्या रणधुमाळीला सामोरं जाण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
राजमाची उद्यानाजवळ हातावरचे पोट असलेली, दिवसभर पेरू विकून उदरनिर्वाह करणाऱ्या भाग्यश्री जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लोणावळा नगरपरिषदेची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. आमदार सुनिल शेळके यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे सर्वसामान्य महिलांच्या संघर्षाला नव्या आशेचे पंख मिळाले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून जगताप कुटुंबाचं उदरनिर्वाह फळ विक्रीच्या व्यवसायावर अवलंबून आहे. अशा प्रसंगी त्यांना व्यवसाय सांभाळत प्रचाराची धुरा ही सांभाळावी लागतीय. त्यामुळं भाग्यश्री दिवसा फळ विक्री करता-करता ही प्रचार करतायेत अन सायंकाळी घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत ही पोहचतायेत. ना मोठे बॅनर, ना मोठा ताफा… फक्त प्रामाणिकपणा, कामाची निष्ठा आणि लोकांचा विश्वास इतकंच त्यांचं भांडवल आहे. याच भांडवलावर भाग्यश्री जगताप निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
advertisement
राजकारणाच्या बाजारात तिकीट मिळवण्यापासून ते मतं मिळवण्यापर्यंत काय-काय करावं लागतं, हे उघड्या डोळ्याने आपण सर्वजण पाहतोय. अशात फळ विक्रेत्या भाग्यश्री स्वतःचं नशीब अजमवतायेत.तर खंडाळा बोरघाट आदिवासी माथ्यावरील बॅटरी हिल परिसरातील आदिवासींच्या पट्ट्यात भाग्यश्री जगताप यांचे जंगी स्वागत होत असून पैशांपेक्षा माणुसकी मोठी असते अन त्याचं माणुसकीच्या जोरावर मी नगरसेविका होणार, असं प्रांजळ मत त्या व्यक्त करतायेत. आता मतदार त्यांची साद ऐकून मतांचे दान भाग्यश्री जगतापांच्या पारड्यात टाकणार का हे निकालाच्या दिनी स्पष्ट होईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Local Body Election : आयारामांचा पत्ता कट, थेट पेरुवालीला तिकिट, कोण आहे अजितदादांची चर्चेतील उमेदवार?
Next Article
advertisement
BMC Election : जे ठाकरेंना समजलं, ते काँग्रेसला कळणार का? बीएमसी निवडणुकीआधी धक्कादायक आकडे समोर...
जे ठाकरेंना समजलं, ते काँग्रेसला कळणार का? BMC निवडणुकीआधी धक्कादायक आकडे समो
  • जे ठाकरेंना समजलं, ते काँग्रेसला कळणार का? बीएमसी निवडणुकीआधी धक्कादायक आकडे समो

  • जे ठाकरेंना समजलं, ते काँग्रेसला कळणार का? बीएमसी निवडणुकीआधी धक्कादायक आकडे समो

  • जे ठाकरेंना समजलं, ते काँग्रेसला कळणार का? बीएमसी निवडणुकीआधी धक्कादायक आकडे समो

View All
advertisement