पुण्यातला घोळ मिटेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मविआच्या बैठकीला दांडी, पडद्यामागे घडामोडी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका पुन्हा तळ्यात मळ्यात असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी दांडी मारली.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच सध्या तळ्यात मळ्यात सुरू आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जायचे की महाविकास आघाडी सोबत राहायचे अशी द्विधा मनस्थिती सध्या शरद पवार यांच्या पक्षाची झालेली आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा चर्चांना सुरुवात झाली आहे.
अजित पवार यांच्यासोबत बैठक फिस्कटल्यानंतर गेल्या दोन दिवसात शरद पवार यांच्या पक्षाचे पदाधिकारी हे महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावत होते. मात्र कालपासून अचानकपणे शरद पवार यांच्या पक्षातील कोणतेही पदाधिकारी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत बैठकीला उपस्थित राहत नाहीयेत.
यापुढे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बैठकीला बोलवायचे नाही, मविआची भूमिका
आजही महाविकास आघाडीची नियोजित बैठक होती. तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी बैठकीला आलेले नाहीत. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने वेगळे लढण्याची भूमिका घेतली. त्याचवेळी मनसे सोबत येते का, याचीही चाचपणी केली. तसेच यापुढे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बैठकीला बोलवायचे नाही, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने घेतला.
advertisement
मविआच्या बैठकीत प्रशांत जगतापही
दुसरीकडे काँग्रेसच्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत सुरू असलेल्या बैठकीला काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रशांत जगताप हेही उपस्थित आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत काहीसे अस्वस्थ पाहायला मिळाले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 5:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्यातला घोळ मिटेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मविआच्या बैठकीला दांडी, पडद्यामागे घडामोडी










