advertisement

एक चूक अन् खेळ खल्लास, क्षणात तरुणाचा झाला कोळसा, पुण्यातील धडकी भरवणारा VIDEO

Last Updated:

पुणे शहर परिसरातील मित्रमंडळ चौकात एक भीषण दुर्घटना घडली आहे. इथं एका तरुणाचा होरपळून मृत्यू झाला आहे.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: पुणे शहर परिसरातील मित्रमंडळ चौकात एक भीषण दुर्घटना घडली आहे. इथं एका तरुणाचा होरपळून मृत्यू झाला आहे. रस्त्याने जात असताना त्याने केलेल्या एका चुकीमुळे क्षणात त्याचा कोळसा झाला आहे. हा धडकी भरवणारा प्रकार परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मित्रमंडळ चौक परिसरात महावितरणचा विद्युत पुरवठा करणारा एक मोठा डीपी बॉक्स आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा बॉक्स नेहमी कुलूप लावून बंद ठेवला जातो. मात्र, संबंधित तरुणाने या बॉक्सचे कुलूप कशाच्या तरी सहाय्याने तोडले. कुलूप तोडल्यानंतर त्याने आत असलेल्या उघड्या विद्युत तारांना हात लावला. वीज प्रवाह अत्यंत उच्च दाबाचा असल्याने तरुणाला जोरदार झटका बसला आणि थेट आगीचा भडका उडाला. यात तरुणाचा जागीच होरपळून मृत्यू झाला.
advertisement
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्या तरुणाने सुरक्षित असलेला डीपी बॉक्स फोडून आत हात का घातला? तो चोरीच्या उद्देशाने तिथे गेला होता की अन्य काही कारण होते, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही.
advertisement

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याद्वारे घटनेचा नेमका क्रम लावला जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलीस या तरुणाची ओळख पटवण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याने आत्महत्या करण्यासाठी अशाप्रकारचं पाऊल उचललं का? त्या अनुषंगाने देखील तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एक चूक अन् खेळ खल्लास, क्षणात तरुणाचा झाला कोळसा, पुण्यातील धडकी भरवणारा VIDEO
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement