स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पवार गटाला बुस्टर, राहुल मोटे गटाने गुलाल उधळला

Last Updated:

Bhum Kharedi Vikri Sangh Election: श्री शिवाजी भूम तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत राहुल मोटे यांच्या गटाने बिनविरोध सत्ता मिळवली आहे.

धाराशिव भूम खरेदी विक्री संघ निवडणूक
धाराशिव भूम खरेदी विक्री संघ निवडणूक
बालाजी निरफळ, भूम (धाराशिव) : येथील छत्रपती श्री शिवाजी भूम तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परांडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी बिनविरोध सत्ता मिळवत आपले एकहाती प्राबल्य कायम ठेवले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते.
खरेदी विक्री संघाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत या संघावर मोटे कुटुंबियांचे वर्चस्व कायम राहिले आहे. एकीकडे सहकार बिकट अवस्था असताना माजी आमदार राहुल मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाचे कामकाज सुरळीत चालू आहे. या संघाचा निकाल जाहीर होताच संचालक,पदाधिकारी यांनी फटाके फोडून, गुलाल उधळत पेढे वाटून जल्लोष साजरा केला.
छत्रपती श्री शिवाजी भूम तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित भूमची २०२५-३० साठी निवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीत १५ जागांसाठी ७३ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज भरले होते. छाननीत ६२ अर्ज वैद्य झाले होते. मंगळवार दिनांक १ रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ उमेदवार वगळता ४७ जणांनी या निवडणुकीतून आपले अर्ज माघारी घेतले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली.
advertisement
या निवडणुकीसाठी रविवारी दिनांक १३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार होती. विकास सेवा सहकारी संस्था सभासदांतून सुषेण जाधव, विजय बोराडे, सुरेश भोरे, रवींद्र पवार, वैयक्तिक सभासदांमधून प्रवीण खटाळ, प्रकाश शेळके, रमेश मस्कर, हिरालाल ढगे, राजेंद्र गाढवे, इतर संस्था सभासदांतून सतीश सोन्ने, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी मधून गौरीशंकर साठे, महिला प्रतिनिधीमधून वर्षा नलवडे, सुधा यादव, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून श्रीराम खंडागळे, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून शहाजी दराडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीतील विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पवार गटाला बुस्टर, राहुल मोटे गटाने गुलाल उधळला
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement