advertisement

नगरमधून 15 वर्षीय मुलीचं अपहरण, जंगलात नेत 5 दिवस लैंगिक अत्याचार, 3 आरोपींना बेड्या

Last Updated:

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला पाच दिवस जंगलात डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.

News18
News18
हरीष दिमोटे, प्रतिनिधी अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. इथं एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला पाच दिवस जंगलात डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणाला आता ‘लव्ह जिहाद’चा अँगल जोडला जात असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. राहुरी पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित १५ वर्षीय मुलगी १३ फेब्रुवारी रोजी 'कॉलेजला जाते' असं सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र, सायंकाळ झाली तरी ती घरी परतली नाही. चिंताग्रस्त पालकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीच पत्ता न लागल्याने त्यांनी तातडीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. मुलीचे अपहरण झाल्याचं लक्षात येताच पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवली.
advertisement

पाच दिवस जंगलात अत्याचार

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीचा आधार घेतला. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, पीडितेला नाशिक–सुरत रोडलगत असलेल्या रामशेज किल्ला परिसरातील घनदाट जंगलात नेण्यात आलं आहे. पोलिसांनी या भागात शोधमोहीम राबवून अत्यंत कौशल्याने मुलीची सुटका केली. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या पाच दिवसांपासून तिला या ठिकाणी डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार करण्यात येत होते.
advertisement

मुख्य आरोपीसह तिघे अटकेत

याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुक्तार हैदर पठाण (मुख्य आरोपी), कौसर हैदर पठाण आणि आकाश शरद संसारे यांचा समावेश आहे. मुख्य आरोपीवर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. पीडितेच्या जबाबानुसार, पोलिसांनी याप्रकरणी पॉक्सो (POCSO) कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, यात आणखी कोणाचा हात आहे का? याचा शोध घेतला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नगरमधून 15 वर्षीय मुलीचं अपहरण, जंगलात नेत 5 दिवस लैंगिक अत्याचार, 3 आरोपींना बेड्या
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement