युनोस्कोच्या यादीत शिवरायांचे 12 किल्ले, दोन उदाहरणं देत राज ठाकरेंचा सरकारला सावध इशारा, म्हणतात '2009 मध्ये जसं...'

Last Updated:

Raj Thackeray warn Maharastra Govt : युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत (UNESCO listed Shivaji maharaj forts) छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांची निवड केली आहे. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे.

Raj Thackeray warn Govt Over Demolish Unauthorized Constructions
Raj Thackeray warn Govt Over Demolish Unauthorized Constructions
UNESCO listed Shivaji maharaj forts : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्रातील रायगड, राजगड, पन्हाळगड, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, सिंधुदुर्ग, साल्हेर, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडू येथील स्वराज्याची तिसरी राजधानी राहिलेला जिंजी किल्ला अशा बारा किल्ल्यांचा World Heritage Sites मध्ये समावेश झालेला आहे. अशातच आता गडकिल्ल्यांविषयी आग्रहाची भूमिका बजावणारे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला अन् सरकारला गंभीर इशारा देखील दिलाय.

काय म्हणाले राज ठाकरे?

निश्चित, अतिशय आनंदाची बाब आहे. या निमित्ताने महाराजांनी रुजवलेला स्वराज्याचा विचार कुठवर पोहचला होता हे महाराष्ट्राचं कर्तृत्व यावर बोलणाऱ्यांना हे कळेल आणि महाराष्ट्र ते थेट दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत दोन भाषांचा आणि संस्कृतींचा सेतुबंध किती जुना आणि मजबूत आहे हे पण कळेल, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी सरकारला इशारा देखील दिला आहे.
advertisement

दोन मोठी उदाहरणं दिली...

फक्त सरकारला एक आठवण करून द्यावीशी वाटते ती म्हणजे युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही. जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं, याची आत्तापर्यंतची दोनच उदाहरणं आहेत पण ती आहेत हे विसरू नका. एक उदाहरण आहे ओमान मधल्या अरेबियन आवरिक्स अभयारण्याचं आणि दुसरं उदाहरण आहे ड्रेस्डन व्हॅलीचं... जर्मनीतील ड्रेस्डन व्हॅलीला जागतिक वारसा दर्जा मिळाला पण निकष न पाळल्याने तो 2009 ला काढून घेतला. यामुळे सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं, असंही राज ठाकरे म्हणाले.
advertisement

अनधिकृत बांधकामं हटवा - राज ठाकरे

दरम्यान, सर्वप्रथम या सर्व गडकिल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती तात्काळ पाडून टाका, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यात जात - धर्म पहाण्याची गरज नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी टोला देखील लगावला आहे. आत्तापर्यंतच्या एकूण एक सरकारांनी गडकिल्ल्यांची जी दुरवस्था करून ठेवली होती त्यामुळे जगाला बोलावून हे किल्ले दाखवावे, आपल्या महाराजांचं, महाराष्ट्राचं वैभव दाखवावं अशी परिस्थिती नव्हती ती आता बदलेल, अशी आशा देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
युनोस्कोच्या यादीत शिवरायांचे 12 किल्ले, दोन उदाहरणं देत राज ठाकरेंचा सरकारला सावध इशारा, म्हणतात '2009 मध्ये जसं...'
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement