advertisement

रुममेटचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढून बॉयफ्रेंडला पाठवले,जिवाभावाच्या मैत्रीणीने केला घात; संभाजीनगर हादरलं

Last Updated:

जिवलग मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ आणि फोटो काढून बॉयफ्रेंडला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर :  संभाजीनगरमध्ये मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. हॉस्टेलच्या रुममेटने आपल्या जिवलग मैत्रीणीचा विश्वास केला आहे.  जिवलग मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ आणि फोटो काढून बॉयफ्रेंडला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकराने संभाजीनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संभाजीनगर शहरातील सिडको एन- 8 परिसरात ही घटना घडली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, समृद्धी जगदाळे असे विश्वासघात केलेल्या मैत्रिणीचे नाव आहे. तर प्रियकराचे नाव स्वराज धालगडे आहे. पीडित तरूणी आणि आरोपी मैत्रीण या संभाजीनगरमध्ये एका हॉस्टेलमध्ये रुममेच म्हणून एकत्र राहत होत्या. 18 जानेवारी रोजी पीडित तरुणी कपडे बदलत असताना समृद्धीने संधी साधून आपल्या मोबाईलमध्ये तिचे खासगी फोटो आणि व्हिडीओ काढले. हे व्हिडिओ तिने तात्काळ तिचा बॉयफ्रेंड स्वराज धालगडे याला पाठवून दिले.
advertisement

जाब विचारणाऱ्या पीडित तरुणीला बेदम मारहाण

दोन दिवसांनी पीडित तरुणीला हा प्रकार लक्षात येताच तीने तात्काळ मैत्रिणीला जाब विचारला. तू माझे कपडे बदलतानाचे फोटो आणि व्हिडीओ काढून तुझ्या बॉयफ्रेंडला का पाठवले? तेव्हा आरोपी तरुणीने उलट पीडित तरूणीशी वाद घातला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपीने बॉयफ्रेंडला बोलावून पीडित तरुणीला बेदम मारहाण केली. एवढच नाही तर तू कोणाला काही बोलली, तर तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करेल असं म्हणत पीडित तरुणीला ब्लॅकमेल केले.
advertisement

सिडकोची पोलीस ठाण्यात धाव 

मात्र तरुणीने धाडस करत अखेर सिडको पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून समृद्धी जगदाळे आणि स्वराज धालगडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पुण्यात घडला होता भयंकर प्रकार  

advertisement
मित्रांशी मैत्री करण्यास नकार दिल्यामुळे तरुणीने तिच्याच मैत्रिणीचे नग्न फोटो व्हायरल केल्याची घटना काही दिवसांपूर्व पुण्याच्या नामांकित कॉलेजमध्ये घडली होती. महाविद्यालयीन तरुणीने तिच्या सोबत राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीचे अर्ध नग्न फोटो काढून मित्रांना पाठवून सोशल मीडियावर व्हायरल केलेत. दरम्यान, त्या रहात असलेल्या फ्लॅटवर आरोपी तरुणीचे मित्र अधून मधून येत असत. आरोपीने या मित्रांची ओळख फिर्यादी तरुणीसोबत करून दिली होती. तसेच त्यांच्यासोबत मैत्री करावी म्हणून ती फिर्यादी तरुणीच्या पाठीमागे तगादा लावत होती. मात्र फिर्यादी तरुणीने मैत्री करण्यास नकार दिला. यावरून त्या दोघीत वादही होत होते.आरोपी तरुणीने फिर्यादीचे खाजगी अर्धनग्न फोटो काढले आणि तिच्या मित्रांपैकी कोणालातरी पाठवले. त्यानंतर वेगवेगळी फेक इंस्टाग्राम अकाउंट काढून त्यावरून फिर्यादी तरुणीचे हे अर्धनग्न फोटो वारंवार व्हायरल केले गेले. त्यानंतर अर्धनग्न फोटो फिर्यादीच्या कुटुंबीय आणि मित्र परिवारामध्ये गेले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रुममेटचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढून बॉयफ्रेंडला पाठवले,जिवाभावाच्या मैत्रीणीने केला घात; संभाजीनगर हादरलं
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement