advertisement

अमोल कोल्हे यांच्या छत्रपती शिवरायांवरील व्याख्यानाला पुण्यात विरोध, विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र, वातावरण तापलं

Last Updated:

शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला विरोध झाल्यामुळे पुण्यात वादाची ठिणगी पडली आहे.

अमोल कोल्हे
अमोल कोल्हे
पुणे : शिवछत्रपतींची भूमिका साकारलेले, शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास असणारे, अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांच्या व्याखानाला पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यासंबंधी विद्यार्थ्यांनी आपल्या सह्यांचे पत्र विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिले आहे. या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येईल, असा त्यांचा आक्षेप आहे. दुसरीकडे कोल्हे यांच्या समर्थनार्थ काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना पत्र लिहिले आहे. शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला विरोध झाल्यामुळे पुण्यात वादाची ठिणगी पडली आहे. दुसरीकडे मी कलाकार म्हणून व्याख्यान द्यायला जाण्याचा कुणाला त्रास व्हायचे काहीच कारण नाही, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

तर कार्यक्रमाला राजकीय रंग येईल, अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला सकल विद्यार्थी समूहाचा आक्षेप

सकल विद्यार्थी समूह विद्यार्थ्यांच्या हिताकरिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमध्ये वारंवार कार्यरत आहे. अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हा उत्सव असून हा सर्व समाजाच्या सामूहिक चेतनेचा जन्म आहे. दिनांक 19 फेब्रुवारी 2025 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर इरावती कर्वे सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांचे भाषण आयोजित केले आहे. या संबंधी शिवजन्मोत्सव विद्यार्थी उत्सव समिती यांना कुठलीही कल्पना न देता केवळ काही लोकांच्या आग्रहामुळे अशा प्रकारे एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या वक्ता निमंत्रित करून कार्यक्रम आयोजित करणे हे व्यवहार्य नाही. त्यामुळे या कार्यक्रमास संपूर्ण राजकीय स्वरूप येणार आहे.
advertisement
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशा प्रकारच्या राजकीय कार्यक्रमास समर्थन करते का? याचे उत्तर प्रशासनाने देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर या वक्त्याचा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी करून सकल विद्यार्थी समूहाच्या वतीने इशाराही देण्यात आला आहे.

अमोल कोल्हे यांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांचे कुलगुरूंना पत्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये दरवर्षी विविध महापुरुषांच्या जयंतीनिमीत्त अभ्यासू आणि गुणवंत वक्त्यांना आमंत्रित केले जाते. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांचे विचार पोहोचवणे, त्यांचे कार्य समजावून सांगणे आणि प्रेरणा देणे हे महत्वाचे कार्य घडत असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण डॉ अमोल कोल्हे यांना विद्यापीठात आमंत्रित केले आहे ही स्वागतार्ह बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा व विचारांचा त्यांना सखोल अभ्यास असून त्यांच्या व्याख्यानातून विदयार्थाना मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळेल. असा आम्हाला विश्वास आहे. यापुढेही अशाच प्रकारे अभ्यासू आणि प्रेरणादायी वक्यांना आमंत्रित करुन महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार विद्यापीठाने करावा, असे कोल्हे यांच्या समर्थनार्थ पत्र लिहिलेल्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अमोल कोल्हे यांच्या छत्रपती शिवरायांवरील व्याख्यानाला पुण्यात विरोध, विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र, वातावरण तापलं
Next Article
advertisement
एका रात्रीत सोन्याचे भाव बदलणार, 'महा-धमाका' होण्याचे संकेत; बातमीने संपूर्ण जगाचे धाबे दणाणले
एका रात्रीत सोन्याचे भाव बदलणार,महा-धमाक्याचे संकेत; बातमीने संपूर्ण धाबे दणाणले
  • 72 तासांत सोन्याचे चित्र पालटणार

  • नवा आकडा पाहून बसेल धक्का

  • भाव असा काही वाढणार की खरेदी करणं होईल केवळ स्वप्न

View All
advertisement