नदीत आढळला सात महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह, संगमनेरमध्ये खळबळ
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
संगमनेर तालुक्यातील पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर घारगांव येथे मुळा नदीच्या पुलाखाली साधारण सहा सात महिन्याच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
हरीष दिमोटे,अहिल्यानगर, संगमनेर : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात मुळा नदीपात्रात एका सात महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळला आहे. घारगाव पोलिसांनी सदर घटनेचा तपास सुरू केला असून नागरिकांनाही मदतीचे आवाहन केले आहे..
संगमनेर तालुक्यातील पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर घारगांव येथे मुळा नदीच्या पुलाखाली साधारण सहा सात महिन्याच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घारगाव पोलीस तपास करीत आहेत.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तपास सुरू केला असून मुलाबाबत कुणाला काहीही माहिती असल्यास त्वरित घारगांव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांनी केले आहे.
Location :
Sangamner,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
December 04, 2025 7:10 PM IST


