Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या सभास्थळाजवळ 2 दुचाकी अचानक पेटल्या अन्.. सांगलीतील घटना
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Manoj Jarange Patil : सांगलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या काही अंतरावर दोन दुचाकीनी अचानक पेट घेतला.
सांगली, (आसिफ मुरसल, प्रतिनिधी) : मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील सध्या विविध जिल्ह्यात शांतता रॅली काढत आहे. आज सांगली जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांची जिल्ह्यात शांतता रॅली पार पडली. सांगलीमध्ये मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांची सभा सुरू असताना त्या सभेच्या काही अंतरावरच दोन दुचाकीनी अचानक पेट घेतल्याची घटना घडली.
जरांगे पाटील यांच्या सभास्थळाजवळ दुचाकींनी घेतला पेट
मनोज जरांगे यांच्या सभास्थळावरुन जवळच दोन दुचाकी जळून खाक झाल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. जळालेल्या वाहनांमध्ये एक इलेक्ट्रिक तर एक पेट्रोल दुचाकी गाडी जळून खाक झाली. अचानकपणे या दोन्ही गाड्या पेटल्याने महापालिका अग्निशमन विभागाला तातडीने बोलावण्यात आलं. यानंतर अग्निशमन विभागाने या दोन्ही गाड्यांच्या आगीवर नियंत्रण आणले. मनोज जरांगे पाटील हे राम मंदिर येथे सभास्थळी बोलण्यास उभे झाल्यानंतर त्यांच्या सभेच्या काही अंतरावर असणाऱ्या अर्बन बँकेजवळ एका तळघरात दुचाकी पेटल्याची घटना घडली.
advertisement
सरकार आरक्षण देणार नसेल तर जिल्ह्यातील विधानसभेत बुक्का करा : मनोज जरांगे
सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार नसेल तर, मराठ्यांनो सांगलीत विधानसभेला बुक्का करा, असं जाहीर आवाहन मनोज जरांगे यांनी केला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असं देखील मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय. सांगलीमध्ये आज मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण शांतता पार पडली. विश्रामबाग चौकापासून राम मंदिर चौकापर्यंत निघालेल्या या रॅलीमध्ये हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते. एक मराठा, लाख मराठा जयघोषाने संपूर्ण सांगली नगरी दुमदुमून गेली होती. राम मंदिर इथल्या चौकात शांतता रॅलीची मनोज जरांगेंच्या जाहीर सभेने सांगता झाली. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा देखील साधला. तसेच नुकतंच सांगली कोल्हापूरला आलेल्या महापुराचा उल्लेख करत राज्य सरकारने तातडीने बुडालेल्या शेतीबद्दल शेतकऱ्यांना नुकसान द्यावे, अशी मागणीही मनोज जरांगे यांनी केली.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
August 08, 2024 10:53 PM IST
मराठी बातम्या/सांगली/
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या सभास्थळाजवळ 2 दुचाकी अचानक पेटल्या अन्.. सांगलीतील घटना