Sanjay Shirsat: एक शिरसाट अन् वाद भरमसाठ! हेच ते 6 गंभीर आरोप, ज्यामुळे पालकमंत्र्यांना ओक्केच आला घाम!
- Published by:sachin Salve
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर सुरू झालेली वादांची मालिका काही संपायचं नाव घेत नाही
सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी
छ.संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर सुरू झालेली वादांची मालिका काही संपायचं नाव घेत नाही. विट्स हॉटेलचा वाद, शेंद्रा एमआयडीसीतील जागेचा वाद यात शिरसाट पुरते अडकले असतानाच आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत शिरसाट यांच्यावर मागासवर्गीय समाजासाठीची जमीन हडपल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा मंत्री संजय शिरसाटांवर गंभीर आरोप केलेत. कोट्यवधींच्या जमिनी शिरसाटांनी कवडीमोल भावात विकत घेतल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.
advertisement
आरोप क्रमांक 1
संजय शिरसाटांनी शाजापूरमध्ये 30 कोटींची जमीन 1 कोटीला घेतल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. आहे. मागासवर्गीय समाजासाठीच्या वर्ग 2 मधील दहा एकर जमीन शिरसाट यांच्या मुलाच्या नावावर आहे.
आरोप क्रमांक 2
छ.संभाजीनगरमधील सर्वात महागड्या जालना रोडवर शिरसाटांनी कवडीमोल किंमतीत भूखंड खरेदी केल्याचा आरोप जलील यांनी केला. जालना रोडवरील 12 हजार स्क्वे.फूट जागा शिरसाटांनी केवळ 5.83 कोटींना खरेदी केल्याची कागदपत्र जलील यांनी दाखवली.
advertisement
आरोप क्रमांक 3
एवढचं काय पण शाजापूरमध्येच शिरसाटांनी दोन भूखंड लाटल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. दोन्ही भूखंड 2 गुंठे 10 एकरच्या आसपास असून एक भूखंड 1 कोटी 50 लाखांमध्ये तर त्याच्याच शेजारचा भूखंड 50 लाखांना खरेदी केल्याचं जलील यांनी सांगितलंय. शाजापूरमध्ये हरिजन समाजाची जागा 10 एकर जागा 1 कोटी 10 लाखांमध्ये घेतली म्हणजे 11 लाख एकरला त्याची मार्केटव्हॅल्यू होती 3 कोटी एकर.
advertisement
खरं तर जलील यांनी यापूर्वीही शिरसाटांवर अशाच प्रकारचे आरोप केले होते.
आरोप क्रमांक 4
व्हीट्स हॉटेल लिलाव प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. 110 कोटींचं हॉटेल शिरसाटांनी 67 कोटींना खरेदी केल्याचा आरोप विरोधकांनी केला. आरोपांनंतर शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत हा या लिलावातून बाहेर पडला होता.
आरोप क्रमांक 5
शेंद्रा MIDC मध्येही शिरसाटांनी भूखंड लाटल्याचा आरोप जलील यांनी केला होता. ट्रक टर्मिनलसाठीची 106 कोटींची जमीन हडपल्याचा आरोप होता. त्यासाठी जमिनीच्या आरक्षणात फेरफार केल्याचा दावा जलील यांनी केला.
advertisement
आरोप क्रमांक 6
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट नाशिकमध्ये पंचतारांकित हॉटेल बांधत असून लवकरच त्याची कागदपत्रं उघड करणार असल्याचा दावा जलील यांनी केला आहे.
जलील यांच्या आरोपांच्या सरबत्तीनंतर न्यूज 18 लोकमतनं संजय शिरसाट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली भूमिका मांडली. पण शिरसाट यांनी कारवाईचा इशारा दिला असला तरी जलील यांनी त्यांच्याविरोधात कागदपत्रांची जंत्रीच सादर केली आहे. त्यामुळे शिरसाट त्यावर काय प्रत्युत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
June 11, 2025 9:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Shirsat: एक शिरसाट अन् वाद भरमसाठ! हेच ते 6 गंभीर आरोप, ज्यामुळे पालकमंत्र्यांना ओक्केच आला घाम!