advertisement

Santosh Deshmukh :10 डिसेंबरला हत्या, फक्त 6,9, 11 तारखांचा सीडीआर काढा, वाल्मिक कराडसोबत...क्षीरसागरांनी संगळंच काढलं

Last Updated:

आज देशमुख हत्या प्रकरणावरून परभणीत मुक मोर्चा काढण्यात आला. यानंतर मोर्चेकरांना संबोधित करताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी तीन तारखा सांगितल्या आहे. या तारखांचे सीडीआर काढल्यानंतर वाल्मिक कराडसोबत सगळेच आरोपी सापडतील,असे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

sandeep kshirsagar on Santosh Deshmukh Case
sandeep kshirsagar on Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Murder Case Update : परभणी : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आता देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. या अटकेसोबत आज देशमुख हत्या प्रकरणावरून परभणीत मुक मोर्चा काढण्यात आला. यानंतर मोर्चेकरांना संबोधित करताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी तीन तारखा सांगितल्या आहे. या तारखांचे सीडीआर काढल्यानंतर वाल्मिक कराडसोबत सगळेच आरोपी सापडतील,असे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे.
परभणीच्या मुक मोर्चातून संदीप क्षीरसागर बोलत होते. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या 10 डिसेंबरला झाली होती. त्यामुळे 6 डिसेंबर, 9 डिसेंबर आणि 11 डिसेंबरचे सीडीआर काढा. हे सीडीआर तपासल्यानंतर काय सूरू आहे? आणि काय नाही सगळं समोर येईल, आणि नुसता वाल्मिक कराड नाही तर खूप जण सीडीआरमधून समोर येतील असे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे.
advertisement
28 तारखेपर्यत हे (वाल्मिक कराड) पुण्यात स्वत:वर इलाज करते होते आणि सगळा तमाशा टीव्हीवरून बघत होते. त्या हॉस्पिटलचे तुम्हाला नावही देतो आणि पत्रही देतो. त्या आठ दिवसामध्ये कोण कोण यांना भेटायला आले ते सीसीटीव्ही मधून बाहेर काढा,अशी मागणी देखील क्षीरसागरांनी केली. तसेच आरोपी फिल्मी स्टाईल अटक झाले आहेत. हे परळी पॅर्टन आपल्याला बंद करायचे आहे, असा इशाराही क्षीरसागरांनी दिला.
advertisement
सरकारने या प्रकरणात अॅक्शन घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दोन नंबरचे धंदे बंद झाले आहेत. पण जेव्हा तपास वाल्मिक कराडवर येतो, तेव्हा तपास कुठेतरी थांबतो, असा आरोप देखील क्षीरसागर यांनी केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh :10 डिसेंबरला हत्या, फक्त 6,9, 11 तारखांचा सीडीआर काढा, वाल्मिक कराडसोबत...क्षीरसागरांनी संगळंच काढलं
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement