advertisement

Satara: भाजप शिवसेनेच्या राड्यात शंभूराज देसाईंना दुखापत, रोहित पवारांनी कड घेतली, सख्ख्या मित्रालाही गिळायला...

Last Updated:

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीचे पडसाद विधान परिषद आणि विधानसभेत उमटल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेची कड घेणारे ट्विट केले आहे.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीवेळी राडा
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीवेळी राडा
मुंबई : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी अभूतपूर्व राडा झाला. सत्ताधारी भाजप शिवसेना हे दोन मित्रपक्षच एकमेकांसमोर उभे ठाकले. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे शिवसेना आमदार महेश शिंदे यांची पत्नी प्रिया शिंदे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्याने त्यांनी सदस्यांच्या जमवा-जमवीपासून संपूर्ण नियोजन केले. त्यांना जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. या नियोजनाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आणि दोन्ही राष्ट्रवादीचा गेम झाला. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शंभूराज देसाई आणि मकरंद आबा पाटील हे दोन्ही मंत्री जिल्हा परिषद आवारात उपस्थित असतानाही आघाडीच्या (शिंदे-राष्ट्रवादी) दोन सदस्यांना मतदान करू दिले नाही. या साऱ्या प्रकाराने शिवसेना संतप्त झाली आहे. या सगळ्याचे पडसाद विधान परिषद आणि विधानसभेत उमटल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेची कड घेणारे ट्विट केले आहे.
सातारा जिल्हा परिषदेत संख्याबळ नसूनही भाजपने रडीचा डाव खेळत आपला अध्यक्ष बसवला. त्यासाठी साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांनी मदत केली, असा गंभीर आरोप शंभूराज देसाई यांनी केला. देसाई यांच्या आरोपांनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली. भाजप जर असेच लागणार असेल तर आम्ही राजीनामे देतो, अशी टोकाची भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली. शिवसेना भाजपच्या संघर्षाची राज्यात चर्चा होत असताना रोहित पवार यांनी सेनेची कड घेऊन भाजपला डिवचले आहे.
advertisement

रोहित पवार काय म्हणाले?

एका जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी गृहखात्याची अफाट ताकद वापरण्यापेक्षा ती अजितदादांच्या अनैसर्गिक पद्धतीने झालेल्या मृत्यूच्या चौकशीसाठी वापरली तर विरोधक असूनही आम्हीही या निर्णयाचं मनापासून स्वागतच केलं असतं, पण त्याऐवजी साताऱ्यात गृहखात्याच्या आशीर्वादाने लोकशाहीचा ढवळ्यादिवसा खून पडतोय, मंत्र्याशीही झटापट करुन त्यांना दुखापत केली जाते आणि याविरोधात खुद्द मंत्र्यांनाच विधिमंडळापुढं आंदोलनही करावं लागतंय.
advertisement
यावरुन भाजपाने कधीकाळी विचारलेला प्रश्न आज नव्याने त्यांनाच विचारण्याची गरज आहे... कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? पण काहीही असो, सत्तेसाठी सख्या मित्रालाही गिळायला भाजप मागंपुढं बघत नाही, हे यानिमित्ताने शिवसेना शिंदे गटाला आणि अजितदादा गटाला कळलंच असेल.. असे रोहित पवार म्हणाले.

शिवसेना मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे नाराजी

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पडसाद अधिवेशनात उमटल्यानंतर शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत शिवसेना मंत्री आणि आमदारांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांची तक्रार केली. तसेच भाजपच्या राजकारणावर देखील नाराजी व्यक्त केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara: भाजप शिवसेनेच्या राड्यात शंभूराज देसाईंना दुखापत, रोहित पवारांनी कड घेतली, सख्ख्या मित्रालाही गिळायला...
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement