'या' ग्राहकांवर संकट! LPG कनेक्शन होऊ शकतं बंद, यात तुम्ही तर नाही ना?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
LPG Crisis : एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे सरकारकडून नियमांमध्ये बदल केले जाताय. आता गॅस एजेन्सीही काही नियम करतेय. याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होतोय.
LPG Crisis amid West Asia Tension: जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धाच्या झळा या भारतापर्यंत पोहोचल्या आहेत. ज्यामुळे देशभरात एलपीजी हा विषय चर्चेत आहे. कारण पुरवठ्यात अडचणी येत असल्याने देशभरात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचं बोललं जातंय. ज्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होतोय. सरकारही एलपीजीविषयीच्या नियमांत बदल करतेय. आता गॅस एजेन्सीही कठोर नियम करताय.
advertisement
advertisement
कोणत्या ग्राहकांवर होणार कारवाई? : ज्या लोकांनी गेल्या 9 महिन्यांपासून किंवा त्यापेक्षा जास्त वेळेपासून गॅस सिलेंडर बुक केलेलं नाही. गॅस कंपन्यांनी असे कनेक्शन सस्पेंटेड कॅटेगिरीमध्ये टाकण्यास सुरुवात केलीये. गॅस सब्सिडी आणि मर्यादित संसाधनाचा फायदा फक्त खऱ्या आणि अॅक्टिव्ह ग्राहकांनचा मिळावा हा यामागील हेतू आहे. सोबतच 'घोस्ट कनेक्शन' म्हणजेच बनावट किंवा निष्क्रिय कनेक्शन संपवणे हे देखील या पावलामागी कारण आहे.
advertisement
advertisement
advertisement
ऑनलाइन ऑप्शनही उपलब्ध : ज्या लोकांना एजेन्सीमध्ये न जाता हे काम करायचंय. ते ऑनलाइन ऑप्शनने करू शकता. तुम्ही Indane, HP किंवा Bharat Gas च्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून e-KYC अपडेट करू शकता. यासाठी “Update KYC” सेक्शनमध्ये जाऊन आपली डिटेल भरावी लागेल आणि आधारशी संबंधित मोबाईल नंबरवर आलेल्या OTP च्या माध्यमातून व्हेरिफिकेशन पूर्ण करावं लागेल. ही वेगवान, सोपी आणि घरबसल्या केली जाणारी प्रोसेस आहे.
advertisement









