Satara : भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम' होणार? जयंत पाटलांनी घेतली बड्या नेत्याची भेट
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
साताऱ्यात भाजपचे माजी आमतार मदन भोसले यांच्या निवासस्थानी जयंत पाटील यांनी बंद दाराआड तासभर चर्चा केली.
सचिन जाधव, प्रतिनिधी
सातारा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने हालचाली सुरू केल्या आहेत. एका बाजूला शरद पवार यांचे वेगवेगळ्या भागात दौऱे सुरू आहेत. सरकारविरोधात आंदोलनातही ते सहभागी होत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या नेत्यांकडून इतर पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. आता जयंत पाटील यांनी भाजपच्या बड्या नेत्याची भेट घेतलीय. साताऱ्यातील माजी आमदार मदन भोसले यांची जयंत पाटील यांनी भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
advertisement
जयंत पाटील आणि मदन भोसले यांची साताऱ्यात भेट झाली. मदन भोसले यांच्या निवासस्थानी जयंत पाटील यांनी बंद दाराआड तासभर चर्चा केली. यामुळे मदन भोसले हे शरद पवार यांच्या गटात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मदन भोसले यांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र भाजपमधील सर्वजण माझे मित्र आहेत असं त्यांनी सांगितलं.
advertisement
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाने पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या काही बड्या नेत्यांना आपल्याकडे वळवलं आहे. त्यात कोल्हापूरच्या समरजीत घाटगे यांनी नुकतंच आपण शरद पवार गटात जाणार असल्याचं स्पष्ट केलंय. यानंतर आता मदन भोसले यांच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे हर्षवर्धन पाटलांचे नावही चर्चेत आहे.
advertisement
मदन भोसले हे भाजपचे नेते असून ते वाई मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. सध्या वाई मतदारसंघात मकरंद पाटील हे अजितदादांचे आमदार आहेत. त्यांचे भाऊ नितीन पाटलांना अजितदादांनी राज्यसभेचा शब्द दिला होता. त्यानुसार नितीन पाटील राज्यसभेवर निवडून गेले. वाईत आता मदन भोसले हे शरद पवार गटाकडून विधानसभेला उमेदवार असू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 25, 2024 12:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara : भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम' होणार? जयंत पाटलांनी घेतली बड्या नेत्याची भेट