साताऱ्यात कारखाली दबून हॉटेल व्यावसायिक तरुणाचा दुर्दैवी अंत, बायकोच्या डोळ्यादेखत तडफडून सोडले प्राण
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Satara News: सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका २५ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचा दुर्दैवी अंत झाला आहे.
सातारा: सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका २५ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. कारचं पंक्चर झालेलं चाक बदलत असताना गाडीचा जॅक निसटल्यामुळे हा अनर्थ घडला आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातल्या तेटली गावात घडली. प्रणय शंकर भोसले (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हॉटेलच्या बाहेरच घडला अपघात
प्रणय भोसले यांचा तेटली येथे हॉटेल व्यवसाय होता. दोन दिवसांपूर्वी त्यांची गाडी हॉटेलबाहेर उभी असताना गाडीचे चाक पंक्चर झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मेकॅनिकला बोलावण्याऐवजी त्यांनी स्वतःच पंक्चर काढण्याचा निर्णय घेतला. गाडीचा जॅक लावून ते गाडीचे चाक काढत होते. अर्धवट चाक काढल्यानंतर गाडी आणखी वर उचलण्याची गरज असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे ते गाडीखाली शिरले, मात्र त्याचवेळी अचानक जॅक निसटला आणि गाडी थेट त्यांच्या छातीवर कोसळली. हा प्रकार घडताच प्रणयने आरडाओरडा करत मदत मागितली,
advertisement
कुटुंबीयांसमोरच घडली दुर्घटना
प्रणय यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्याची पत्नी आणि वडील तात्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी गाडी बाजूला करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना गाडीखालून बाहेर काढण्यात आले आणि तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्रणय यांचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भोसले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
September 13, 2025 11:48 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
साताऱ्यात कारखाली दबून हॉटेल व्यावसायिक तरुणाचा दुर्दैवी अंत, बायकोच्या डोळ्यादेखत तडफडून सोडले प्राण