BREAKING: नगरचं राजकारण ढवळून काढणारा नेता हरपला, अरुण काका जगताप यांचं निधन
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Arunkaka Jagtap Passed Away: विधान परिषदेचे माजी आमदार आणि अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अरुण काका जगताप यांचं आज दुःखद निधन झालं.
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहिल्यानगर : विधान परिषदेचे माजी आमदार आणि अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अरुण काका जगताप यांचं आज दुःखद निधन झालं. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकारण, समाजकारण आणि क्रीडाक्षेत्रात आपला ठसा उमटवणारे अरुण काका जगताप हे अहिल्यानगर शहराचं महत्त्वाचं नेतृत्व होतं.
अरुणकाका जगताप यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष, अहमदनगर पालिकेचे नगराध्यक्ष, तसेच सलग दोनवेळा विधान परिषदेचे आमदार म्हणून काम केलं आहे. याशिवाय क्रीडा क्षेत्रातही त्यांचा मोठा सहभाग होता. ते अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सदस्य होते. शिक्षण क्षेत्रातही योगदान देताना गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे.
advertisement
अरुणकाका जगताप यांना अहिल्यानगरचं राजकारण ढवळून काढणारा नेता म्हणूनही ओळखलं जायंचं. अनेक वर्षे नगरचं राजकारण त्यांच्याभोवतीच फिरत होता. अशा महत्त्वाच्या नेत्यानं शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. नगर शहरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम जगताप हे अरुणकाका जगताप यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या सून शितल संग्राम जगताप या नगरसेविका आहेत. सून स्नुषा सुवर्णा सचिन जगताप या जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. सुपुत्र सचिन अरुण जगताप हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत.
advertisement
अरुण काका हे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे व्याही आहेत. तर आमदार संग्राम जगताप हे शिवाजी कर्डिले त्यांचे जावई आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. अरुण काकांच्या निधनामुळे एक अनुभवी नेतृत्व हरपल्याची भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
view commentsLocation :
Ahmadnagar (Ahmednagar),Ahmadnagar,Maharashtra
First Published :
May 02, 2025 7:42 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BREAKING: नगरचं राजकारण ढवळून काढणारा नेता हरपला, अरुण काका जगताप यांचं निधन


