धाराशिवमध्ये शिवजयंती मिरवणुकीत तोफेचा स्फोट, एकाचा गळा तर मुलीचा गाल भाजला, दोघे गंभीर जखमी

Last Updated:

Dharashiv Shiv Jayanti Cannon Blast : धाराशिवमध्ये शिवजयंती रॅलीदरम्यान तोफेचा स्फोट होऊन दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

धाराशिवमध्ये तोफेचा स्फोट
धाराशिवमध्ये तोफेचा स्फोट
बालाजी निरफळ, धाराशिव : संपूर्ण महगाराष्ट्रात मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा सोहळा पार पडत असताना धाराशिवमध्ये सोहळ्याला अपघाताचे गालबोट लागले. धाराशिवमध्ये शिवजयंती रॅलीदरम्यान तोफेचा स्फोट होऊन दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारा गावातील ही घटना आहे. शिवजयंतीचा उत्साह आणि उत्कंठा शिगेला पोहोचलेली असताना मिरवणूक सुरू असतानाच तोफेचा स्फोट झाला. तोफेचा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप कळू शकलेले नाही.
दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून अक्षता संतोष भराटे (वय 12, रा. पारा) आणि महेंद्र किंचन गवळी (वय 35, रा. पारा) अशी त्यांची नावे आहेत. महेंद्र किंचन गवळी याच्या गळ्याला जखम आहे तर अक्षता संतोष भराटे हिचा गाल भाजला आहे. धाराशिव च्या शासकीय रुग्णालयात दोघांवरही उपचार सुरू आहेत.
advertisement
शिवजयंतीची मिरवणूक सुरू असतानाच अचानक स्फोट झाला. त्यामुळे उपस्थित लोकांची भीतीने पांगापाग झाली. स्फोटाच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोट नेमका कारणामुळे आणि कशामुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या दुर्घटनेने शिवजयंती उत्सवावर दुःखाची छाया पसरली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धाराशिवमध्ये शिवजयंती मिरवणुकीत तोफेचा स्फोट, एकाचा गळा तर मुलीचा गाल भाजला, दोघे गंभीर जखमी
Next Article
advertisement
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement