Female Auto Driver: संसाराचा गाडा ओढण्यासाठी तिने हाती घेतलं रिक्षाचं स्टिअरिंग, सोलापुरातील रिक्षावाली दिदीची प्रेरणादायी गोष्ट
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Female Auto Driver: शोभा घंटे यांनी पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करायचा निर्णय घेतला.
सोलापूर: आजपासून (22 सप्टेंबर) राज्यात मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने नवरात्रौत्सव साजरा केला जाणार आहे. नवरात्रीत घटस्थापना करून 9 दिवस देवीच्या 9 रुपांची पूजा केली जाते. हिंदू संस्कृतीमध्ये असं मानलं जातं की प्रत्येक स्त्रीमध्ये देखील देवीचं 9 रुपं असतात. दैनंदिन आयुष्य जगत असताना विविध प्रसंगी स्त्रीची विविध रुपं दिसतात. सोलापूर शहरातील महिला रिक्षा चालक शोभा घंटे या देखील नवदुर्गेचं रुप घेऊन आयुष्यातील प्रत्येक प्रसंगावर मात करत आहेत.
रिक्षाचालक शोभा घंटे या सोलापूर शहरातील म्हेत्रे वस्ती येथे वास्तव्याला आहेत. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांचे पती एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होते. पतीच्या पगारावर घर कसं चालणार? मुलांचं शिक्षण कसं होणार? हा प्रश्न शोभा यांना नेहमी पडत होता. म्हणून त्यांनी पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करायचा निर्णय घेतला आणि रिक्षाचालक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला.
advertisement
शोभा यांनी एका खासगी ड्रायव्हिंग स्कूलमधून चालक होण्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं. 2018 मध्ये एका बँकेतून कर्ज घेऊन त्यांनी रिक्षा खरेदी केले आणि आपलं काम जोमान सुरू केलं. दोन वर्षांपूर्वी शोभा घंटे यांच्या पतीचं निधन झालं. पतीचा आधार गेल्यानंतर कोणतीही स्त्री मानसिकदृष्ट्या खचते. मात्र, शोभा यांनी त्यावर मात केली. आपल्या मुलाला मोठ्या अधिकारी पदावर पोहोचवण्यासाठी त्यांनी आता कायमस्वरूपी रिक्षाचं स्टिअरिंग हाती घेतलं.
advertisement
लग्नापूर्वी शोभा घंटे यांना पोलीस दलात भरती व्हायचं होतं. पोलीस भरतीसाठी त्यांनी अनेकदा प्रयत्नही केले होते. पण, उंची कमी असल्याने त्या भरती होऊ शकल्या नाही. 2007 पासून त्या होमगार्ड देखील आहेत. सध्या रिक्षाचालकाचाही हा होईना पण, खाकी वर्दी परिधान करून त्या सोलापुरात रिक्षाचालवत आहेत. प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित पोहोचवण्याचं काम त्या करत आहेत. अनेक प्रवासी शोभा घंटे यांच्याशी समोरून संपर्क साधतात आणि त्यांच्या रिक्षातून प्रवास करतात.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 22, 2025 12:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Female Auto Driver: संसाराचा गाडा ओढण्यासाठी तिने हाती घेतलं रिक्षाचं स्टिअरिंग, सोलापुरातील रिक्षावाली दिदीची प्रेरणादायी गोष्ट