धक्कादायक! नायलॉन मांजाने गळा चिरला, पाथर्डीत 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Last Updated:

नायलॉनमुळे जखमी झालेल्या तरुणाला जिल्हा रुग्णाला उपचारासाठी तातडीनं दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे.

News18
News18
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: संक्रांतीचा आनंद आणि पतंग उडवण्याचा उत्सव देशभरात सुरू असताना धोत्रे कुटुंबियांवर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नायलॉन मांजामुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. राज्यात नायलॉन मांजावर बंदी असतानाही बऱ्याच ठिकाणी तो वापरला जात आहे. नायलॉन मांजामुळे गळा चिरला.
नाशिकच्या पाथर्डी इंदिरानगर परिसरात ही दुर्घटना घडली. नायलॉनमुळे जखमी झालेल्या तरुणाला जिल्हा रुग्णाला उपचारासाठी तातडीनं दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. सोनू किसन धोत्रे अस नायलॉन मांजामुळे मृत्यू झालेल्या 23 वर्षीय युवकाचे नाव आहे.
राज्यात नायलॉन मांजा वापरणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. नाशिकमध्ये 9 अल्पवयीन मुलांच्या वडिलांना पोलिसांनी अटक करुन तुरुंगात पाठवलं. नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवत असताना पोलिसांनी या मुलांच्या पालकांवर कारवाई केली. नाशिकमध्ये आतापर्यंत 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यापैकी 13 जणांना न्यायालयीन तर 8 जणांना 2 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
advertisement
जळगाव शहरातील बेंडाळे चौक ते पांझरापोळ चौक दरम्यान प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांना शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दर्शन शिंपी नामक तरुणासह एका अल्पवयीन बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघ जण चोरून नायलॉन मांजा विक्री करताना पोलिसांना आढळून आलेत. त्यांच्याविरुद्ध BNS कलम 125, 223 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम 5, 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
advertisement
नोकरीवर जाणाऱ्या फौजदाराचा नायलॉन मांजाने गळा चिरला. अति रक्तस्त्राव होऊन पोलीस फौजदार बेशुद्ध झाला होता. रक्तबंबाळा अवस्थेत नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. दीपक पारधे असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस फौजदाराचे नाव आहे. साताऱ्याहून जात असताना घटन घडली. नायलॉन मांजा पकडण्यात शहर पोलीस अपयशी झाल्याचा संताप व्यक्त केला जातोय, चक्क पोलीस अधिकारीच जखमी झाल्याच्या घटना समोर आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धक्कादायक! नायलॉन मांजाने गळा चिरला, पाथर्डीत 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Next Article
advertisement
Dharashiv News: तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळल्या!
तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु
  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

View All
advertisement