Sindhudurga ZP Winning Candidate : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतल्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Sindhudurga ZP Winning Candidate : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज, सोमवार ९ फेब्रुवारी रोजी जाहीर होत आहे.
सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज, सोमवार ९ फेब्रुवारी रोजी जाहीर होत आहे. सकाळपासूनच जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून उमेदवारांसह कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जिल्हा परिषदेच्या ५० तर पंचायत समितीच्या १०० जागांसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणीद्वारे चित्र स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीत जिल्हाभरात सरासरी ६१.९८ टक्के मतदानाची नोंद झाली. विशेषतः ग्रामीण भागातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर उपस्थिती लावली. दुपारनंतर अनेक केंद्रांवर मतदानाचा टक्का झपाट्याने वाढल्याचे दिसून आले.
आठ तालुक्यांत एकाच वेळी मतमोजणी
जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये सकाळी १० वाजता एकाच वेळी मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला. प्रत्येक पंचायत समिती गणासाठी १० ते १४ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने मोजणी पार पडणार असून सुरक्षेच्या कडक बंदोबस्तात ही प्रक्रिया सुरू आहे. मतमोजणी केंद्रांबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येत आहे.
advertisement
जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची यादी
मतमोजणी सुरू होताच काही गटांतील निकाल स्पष्ट झाले असून बिनविरोध निवड झालेले उमेदवार आधीच घोषित झाले होते.
बिनविरोध निवडलेले उमेदवार
खारेपाटण – प्राची इस्वालकर (भाजप)
बांदा – प्रमोद कामत (भाजप)
जाणवली – रुहिता तांबे (शिंदे शिवसेना)
पडेल – सुयोगी घाडी (भाजप)
बापर्डे – अवनी तेली (भाजप)
advertisement
पोंगुर्ले – अनुराधा नारकर (भाजप)
किंजवडे – सावी लोके (भाजप)
कोळपे – प्रमोद रावराणे (भाजप)
इतर महत्त्वाचे निकाल
उरण नवघर मतदारसंघ – प्रेरणा पाटील (शिवसेना ठाकरे गट)
मालवण आडवली मालडी – सोनाली घाडीगांवकर (शिवसेना)
सावंतवाडी आंबोली – शोभा गावडे (भाजप)
कोलगाव – मायकल डिसोझा (भाजपचे बंडखोर उमेदवार)
देवगड पुरळ पंचायत समिती – संजना आळवे (भाजप)
advertisement
कोलगावमध्ये बंडखोराचा विजय चर्चेत
कोलगाव गटात भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उभे राहिलेले मायकल डिसोझा यांनी विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधले आहे. पक्षातील अंतर्गत मतभेद आणि बंडखोरीचा परिणाम निकालावर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Location :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 12:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sindhudurga ZP Winning Candidate : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतल्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी









