Solapur Crime : खाऊन पिऊन सुखी संसार, पण असं काय झालं? आईने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेत सगळंच संपवलं!

Last Updated:

Solapur Crime News : उत्तर सोलापूर तालुक्यात हृदय पिळून टाकणारी घटना समोर आली आहे. आईची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Solapur Crime mother finished
Solapur Crime mother finished
Solapur Crime News : पोरं कितीही मोठी झाली तरी आईसाठी ती लहानच असतात. आईसाठी लेकरं म्हणजे दुधावरची साय, असं म्हटलं जातं. मुलांना काहीही पडू नये म्हणून मायबाप सतत काळजी घेत असतात. अशातच आता सोलापूरातून हृदय पिळून टाकणारी घटना समोर आली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी गावात 12 मार्च दुपारी बारा वाजता एक हादरवणारी घटना घडली. वांगी गावात विहिरीत आत्महत्या केल्यानंतर आई आणि एका मुलाचा मृतदेह काढण्यात प्रशासनालाही यश तर दुसऱ्याचा मृतदेहाची शोध मोहीम सुरू आहे.

टोकाचं पाऊल का उचललं?

चित्रा कविराज उर्फ दत्तात्रय हाके, दोन वर्षीय स्वराज्य कविराज हाके तर पाच वर्षे पृथ्वीराज कविराज हाके असे मृत झालेल्यांची नावे, चित्रा आणि स्वराज्य यांचे मृतदेह सापडले तर पृथ्वीराज याचा मृतदेह सापडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. चित्र हाके यांनी पहिला मुलगा गतिमंद तर दुसरा मुलगा कमी ऐकू येत असल्याच्या तणावातून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जातोय. हाके या आपल्या पतीसह वांगी गावातील वस्तीवर राहतात, चित्रा हाके यांना एक मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे.
advertisement

50 ते 60 फूट विहिरीत उडी

मोठा मुलगा पृथ्वीराज हा गतीमंद असल्यामुळे मोठा खर्च होत होता तर दुसरा स्वराज्याला कमी ऐकू येत असल्यामुळे चित्र हाके यांनी टोकाचे पाऊल उचलण्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चित्रा हाके यांनी शेतातील 50 ते 60 फूट विहिरीत उडी घेऊन दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केली आहे. त्यानंतर आता सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रकरणाची नोंद सुरू झाली आहे.
advertisement
दरम्यान, खाऊन पिऊन सुखी संसार, पण टोकाचं पाऊल उचलण्याचं दुसरं कारण काय असावं? असा सवाल विचारला जात आहे. या प्रकरणात आणखी कोणता अँगल आहे का? यावर देखील पोलीस तपास करत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur Crime : खाऊन पिऊन सुखी संसार, पण असं काय झालं? आईने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेत सगळंच संपवलं!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement