वारकऱ्यांना टोलमाफी तरीही अडवणूक, एकाला मारहाण केल्याची घटना
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
टोल नाक्यावर वारकऱ्यांची गाडी अडवण्यात आली आणि अरेरावीची भाषा करत टोल भरावाच लागेल असं सांगण्यात आलं.
मालेगाव : वारकऱ्यांना टोल माफी असे राज्याचे मुख्यमंत्री यांनी आदेश दिल्यानंतरसुद्धा वारकऱ्यांना ठिकठिकाणी अडवणूक केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार मालेगाव तालुक्यातील वडगांव येथील वारकऱ्यांना आला आहे. टोल नाक्यावर वारकऱ्यांची गाडी अडवण्यात आली आणि अरेरावीची भाषा करत टोल भरावाच लागेल असं सांगण्यात आलं. यात एका वारकऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आलीय.
याबाबत मिळालेली माहिती, मालेगाव तालुक्यातल्या वडगांव इथले वारकरी पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी आले होते. तिथून दर्शन घेऊन परतत असताना ते कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला निघाले होते. तेव्हा बोरगाव टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी अढवली. टोल भरावाच लागेल असं म्हणत एका वारकऱ्याला अमानुष मारहाण करण्यात आली.
वारकऱ्याचा एसटी बसमध्ये झाला मृत्यू
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोंडाळा येथील पंढरपूरला गेलेल्या साठ वर्षीय वारकऱ्याचा गावी परत येताना एसटी बसमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रामराव रहाटे असं या मयत वारकऱ्याचे नाव आहे. ते आषाढीवारीसाठी पायी दिंडीमध्ये पंढरपूरला गेले होते. परंतु त्यांची तब्येत बिघडल्याने आज ते एका सहकाऱ्यासह एसटी बसने गावाकडे परत निघाले होते. दरम्यान आज सायंकाळी एसटी बस सेनगावला पोचण्यापुर्वी त्यांना श्वसनाचा त्रास झाला होता आणि प्रवासातच त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने गोंडाळा गावावर शोककळा पसरली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 18, 2024 7:47 AM IST


