advertisement

Solapur Crime : गर्लफ्रेंडच्या कुटूंबियांनी एक चूक केली अन् हरिषने उचललं टोकाचं पाऊल; भाग्यलक्ष्मी लॉजच्या 120 नंबरच्या खोलीत 48 तास काय घडलं?

Last Updated:

Solapur Crime News : हरिषचे एका तरुणीवर प्रेम होते. त्याच्या कुटुंबीयांनी त्या मुलीच्या घरी जाऊन लग्नाची मागणीही घातली होती, मात्र मुलीच्या वडिलांनी त्यांना दाद दिली नाही.

Solapur Crime Girlfriend parents
Solapur Crime Girlfriend parents
Solapur Crime News : सोलापूरमधील जुना पुणे नाका परिसरातील भाग्यलक्ष्मी लॉजमध्ये एका 28 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. हरिष भास्कर बंडी असं या दुर्दैवी तरुणाचं नाव असून, त्याच्या या टोकाच्या पावलामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नाला नकार देऊन अपमान केल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे.

अपमानास्पद वागणूक अन् हरिष नैराश्यात गेला

मिळालेल्या माहितीनुसार, हरिषचे एका तरुणीवर प्रेम होते. त्याच्या कुटुंबीयांनी त्या मुलीच्या घरी जाऊन लग्नाची मागणीही घातली होती, मात्र मुलीच्या वडिलांनी त्यांना दाद दिली नाही. उलट अपमानास्पद वागणूक दिल्याने हरिष प्रचंड नैराश्यात गेला होता. बुधवारी तो घराबाहेर पडला आणि त्यानंतर त्याचा मोबाईल बंद लागल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती.
advertisement

लॉजमध्ये 120 क्रमांकाची रूम

हरिषने जुना पुणे नाका येथील लॉजमध्ये 120 क्रमांकाची रूम भाड्याने घेतली होती. शनिवारी त्या रूममधून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने लॉज प्रशासनाने तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिले असता, हरिषने पंख्याला कापडाच्या साह्याने गळफास घेतल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो हॉस्पिटलमध्ये हलवला.
advertisement

आईने हंबरडा फोडला

शासकीय रुग्णालयात मुलाचा मृतदेह पाहताच त्याच्या आईने मोठा हंबरडा फोडला. माध्यमांशी बोलताना त्यांनी आरोप केला की, "माझा मुलगा फक्त त्या मुलीला भेटण्यासाठी तडफडत होता, पण तिच्या पालकांनी त्याला भेटू दिले नाही." मुलीच्या आई-वडिलांच्या आडमुठेपणामुळेच हरिषने आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या पालकांनी केला असून या मृत्यूला त्यांनाच जबाबदार धरले आहे.
advertisement

सीसीटीव्हीची तपासणी 

दरम्यान, या घटनेमुळे सोलापूरमधील नीलम नगर परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आहे. प्रेमात मिळालेल्या नकारातून तरुणाने उचललेले हे पाऊल समाजासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून लॉजमधील सीसीटीव्ही (CCTV) आणि हरिषच्या मोबाईलची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Crime : गर्लफ्रेंडच्या कुटूंबियांनी एक चूक केली अन् हरिषने उचललं टोकाचं पाऊल; भाग्यलक्ष्मी लॉजच्या 120 नंबरच्या खोलीत 48 तास काय घडलं?
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement