Railway Update: सोलापूर – हुबळी रेल्वेसेवा 10 दिवस विस्कळीत, 9 गाड्या रद्द, गैरसोय टाळण्यासाठी पाहा वेळापत्रक
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Railway Update: सोलापूरहून कर्नाटक आणि दक्षिणेत जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हुबळीकडे जाणारी रेल्वेसेवा 10 दिवस विस्कळीत राहणार आहे.
सोलापूर - दक्षिण-पश्चिम रेल्वे हुबळी विभागातील अलमट्टी, जनमकुंटी, मुगळोळी आणि बागलकोट या 35 किलोमीटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. याच पार्श्वभूमीवर 14 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान 9 गाड्या रद्द राहणार असून काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. यामध्ये सोलापूर ते होस्पेटसह 9 रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. यामुळे विजयपूर, धारवाड, हम्पी, होस्पेट तसेच दक्षिण कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
हम्पी, होस्पेट, सोलापूर, पंढरपूर, धारवाड व हुबळी या रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्याचे काम झाल्यावर रेल्वे गाड्यांची गती वाढणार असून प्रवाशांच्या वेळेची बचत देखील होणार आहे. तसेच पंढरपूर म्हैसूर गोलगुंबज एक्सप्रेस 23 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथून 60 मिनिटे उशिरा सुटेल. प्रवाशांनी वेळेतील बदल लक्षात घेऊन प्रवास करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट किंवा स्थानिक रेल्वे स्थानकावर तपशील तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
advertisement
यशवंतपूर - विजयपूर एक्सप्रेस बागलकोट पर्यंत धावणार आहे. तर विजयपूर - यशवंतपूर एक्सप्रेस 12 ते 13 ऑगस्ट रोजी बागलकोटून सुरू होईल. म्हैसूर ते बागलकोट बसवा एक्सप्रेस विजयपूर ऐवजी 14 ते 23 ऑगस्ट दरम्यान बागलकोट पर्यंत धावणार असून सुपरफास्ट होस्पेट - मुंबई 13 ते 22 ऑगस्ट रोजी विजयपूरहून सुरू होईल. 14 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट रोजी मंगळूर ते विजापूर एक्सप्रेस बागलकोट - हुबळीपर्यंत धावेल आणि विजयपूर मंगळूर ही एक्सप्रेस गाडी बागलकोट - हुबळी होऊन सुरू होईल. तर 14 ते 19 ऑगस्ट पर्यंत हुबळी विजापूर पॅसेंजर बागलकोट पर्यंत धावेल.
advertisement
अलमट्टीमध्ये या गाड्यांना नाही थांबा
बनारस - हुबळी 17 ऑगस्ट, 18 ते 22 ऑगस्ट म्हैसूर - पंढरपूर गोलगुंबज, 19 ते 22 ऑगस्ट पंढरपूर - म्हैसूर गोलगुंबज एक्सप्रेस, 19- 22 ऑगस्ट मुंबई - होस्पेट सुपरफास्ट, 19- 23 होस्पेट - मुंबई सुपरफास्ट, 17 व 19 ऑगस्ट बिकानेर - यशवंतपूर, 22 ऑगस्ट यशवंतपूर - बिकानेर, 20 ऑगस्ट साईनगर शिर्डी - म्हैसूर.
advertisement
रेल्वे महामार्गाच्या दुहेरीकरणामुळे या गाड्या रद्द
20 ते 23 ऑगस्टदरम्यान विजापूर-हुबळी पॅसेंजर, 17 ते 24 ऑगस्टदरम्यान सोलापूर-धारवाड डेली पॅसेंजर, 17 ते 23 ऑगस्टदरम्यान हुबळी-विजापूर इंटरसिटी, 14 ते 24 ऑगस्टदरम्यान सोलापूर-होस्पेट-सोलापूर एक्स्प्रेस, 16 ते 24 ऑगस्टदरम्यान हुबळी-सोलापूर डेली पॅसेंजर.
अलमट्टी, जनमकुंटी, मुगळोळी आणि बागलकोट या 35 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे रेल्वे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. काही गाड्या रद्द आहेत, तर काहींच्या मार्गात बदल झाला आहे. दोन दिवसांत निश्चित नोटीफिकेशन निघेल, अशी माहिती वरिष्ठ मंडल प्रबंधक योगेश पाटील यांनी दिली.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
August 09, 2025 10:03 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Railway Update: सोलापूर – हुबळी रेल्वेसेवा 10 दिवस विस्कळीत, 9 गाड्या रद्द, गैरसोय टाळण्यासाठी पाहा वेळापत्रक