Vande Bharat: शेगाव भक्तांसाठी खूशखबर, पुणे-नागपूर वंदे भारत संत नगरीत थांबणार

Last Updated:

Nagpur - Pune Vande Bharat: नागपूर (अजनी) पुणे वंदे भारत एक्स्प्रेस आता संत नगरी शेगाव येथे थांबा घेणार आहे. त्यामुळे शेगावच्या गजानन महाराज भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Vande Bharat Express 
Vande Bharat Express 
नागपूर: संत नगरी शेगाव हे विदर्भ वासियांचे श्रद्धास्थान आहे. दररोज हजारोंच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी इथं जातात. पण, शेगावला जाण्यासाठी ट्रेन किंवा इतर साधने खूप कमी आहेत. त्यामुळे भक्तांची गैरसोय होते. जिवाचे हाल करून त्यांना मिळेल त्या ट्रेनने ते प्रवास करतात. भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी नागपूर (अजनी) पुणे वंदे भारत एक्स्प्रेस ही संत नगरी शेगाव येथे थांबावी अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. त्या मागणीला आता यश आले आहे. नागपूर (अजनी) पुणे वंदे भारत एक्स्प्रेस आता संत नगरी शेगाव येथे थांबा घेणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखविणार हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी म्हणजेच 10 तारखेला श्री माता वैष्णोदेवी कटरा-अमृतसर, बेळगाव-बंगळुरू आणि अजनी-पुणे वंदे भारत ट्रेनला सकाळी 9 वाजता हिरवा झेंडा दाखविणार असल्याची माहिती मिळाली आहे. अजनी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस नागपूर-पुण्यादरम्यान येणाऱ्या 9 स्थानकांवर थांबत होती. त्यात वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड आणि दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव या स्थानकांचा समावेश होता. तसेच असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या संत नगरी शेगाव येथील स्थानकावरही थांबा द्यावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली होती.
advertisement
नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला शेगाव थांबा
शेगावमध्ये रोज असंख्य भाविक दर्शनासाठी जातात. पुणे नागपूर वंदे भारत ही गाडी शेगावला जाता-येताना थांबल्यास त्याचा भाविकांना मोठा फायदा होऊ शकतो, तसेच रेल्वेलाही त्यातून मोठे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. हे लक्षात आणून दिल्यानंतर गुरुवारी रात्री रेल्वेचे कोचिंग डायरेक्टर संजय आर. नीलम यांच्या सहीनिशी एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात वंदे भारत एक्स्प्रेसला शेगाव स्थानकावरही थांबा देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच, यवतमाळशी जुळता यावे म्हणून या गाडीला धामणगाव आणि चांदूर स्थानकावरही थांबे देण्यात यावे, अशीही मागणी त्या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.
advertisement
राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ कार्यक्रम मुख्य रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे यावेळी उपस्थित राहतील. त्यामुळे रेल्वेस्थानकाच्या आत आणि बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Vande Bharat: शेगाव भक्तांसाठी खूशखबर, पुणे-नागपूर वंदे भारत संत नगरीत थांबणार
Next Article
advertisement
BJP Candidate List BMC Election: भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवारांची यादी...
भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवा
  • भाजपने आपल्या उमेदवार यादीत जुन्या चेहऱ्यांसह नवख्यांनादेखील संधी दिली आहे.

  • मुंबईत भाजपा 136, तर शिंदेंची शिवसेना 90 जागा लढवणार आहे.

  • मुंबई महापालिकेची सत्ता काबिज करण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे.

View All
advertisement