Solapur Goa Flight: 10 तासांचा प्रवास तासाभरात, सोलापूर-गोवा विमानाचे बुकिंग सुरू, प्रवासाची वेळ, तिकीट दर काय?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Solapur Goa Flight: सोलापूर गोवा विमानसेवेला अखेर मुहूर्त मिळाला असून बुकिंग सुरू झाले आहे. 9 जूनपासून आठवड्यातून चार दिवस ही सेवा असणार आहे.
सोलापूर: गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरच्या विमानसेवेला ‘तारीख पे तारीख’ सुरू होती. मात्र, बहुप्रतीक्षेत असणाऱ्या विमानसेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या 9 जूनपासून सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू होईल. ही सेवा आठवड्यातून चार दिवस असणार आहे, अशी माहिती ‘फ्लाय 91 एअरलाईन्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी दिली.
सोलापूर विमानसेवा सुरू होणार असल्याच्या तारखा यापूर्वीही अनेकदा जाहीर करण्यात आल्या होत्या. परंतु, प्रत्यक्षात विमानसेवा सुरू झालीच नव्हती. आता मात्र विमानसेवेचा मुहूर्त जाहीर करतानाच कंपनीने तिकीट बुकिंगच सुरू केले आहे. दुपारी 4 वाजता कंपनीच्या वेबसाईटवर तिकीट बुकिंग सुरू झाले. तेव्हा गोव्याचे तिकीट दर 3400 रुपये होता. परंतु, तासारभरातच सर्चिंग वाढलं आणि गोव्यासाठी तिकीटाचा दर थेट 4202 पर्यंत गेला.
advertisement
कशी असेल विमानसेवा?
सोलापूर ते गोवा विमानसेवा आठवड्यातून चार दिवस असणार आहे. सोलापूरकरांना दर आठवड्याला सोमवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे चार दिवस गोव्यासाठी विमानाने जाता येईल. 9 जून रोजी (सोमवार) सकाळी 8.50 वाजता सोलापुरातून गोव्यासाठी पहिले उड्डाण होईल. हे विमान 10.05 वाजता गोव्यातील मनोहर विमानतळावर उतरणार असून तिकिटाचा मूळ दर 3500 रुपये असेल.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
May 28, 2025 10:13 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Goa Flight: 10 तासांचा प्रवास तासाभरात, सोलापूर-गोवा विमानाचे बुकिंग सुरू, प्रवासाची वेळ, तिकीट दर काय?