advertisement

 दारूची नशा अन् कारल्याचा राग! पोटच्या मुलाने 65 वर्षीय आईचा जीव घेतला; डोंगरगावची धक्कादायक घटना

Last Updated:

कारल्याची भाजी बनवली म्हणून वाद झाला, हाच वाद बघता बघता विकोपाला गेला आणि अनर्थ घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

News18
News18
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगरगाव येथे कारल्याची भाजी बनवल्याच्या कारणावरून झालेल्या शुल्लक वादातून एका मुलाने आपल्या जन्मदात्री आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त कारल्याची भाजी बनवली म्हणून वाद झाला, हाच वाद बघता बघता विकोपाला गेला आणि अनर्थ घडलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव जगदीश पेटकुले (वय 36) असून मृत महिलेचे नाव सुमित्राबाई पेटकुले (वय 65 ) आहे. आरोपीची पत्नी सुमारे दोन महिन्यांपूर्वी मुलांना घेऊन माहेरी गेली होती. त्यामुळे जगदीश हा आपल्या आई सुमित्राबाई यांच्यासोबतच राहत होता. काल रात्री घरातील स्वयंपाक त्यांनी लवकर आटोपला. मात्र जेवण करताना कारल्याची भाजी बनवल्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. हा वाद क्षणातच उग्र रूप धारण करून हिंसक झटापटीत बदलला.
advertisement

आईला बेदम मारहाण

रागाच्या भरात आणि दारूच्या नशेत असलेल्या जगदीशने आईला बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत सुमित्राबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला, छातीला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. मारहाणीनंतर त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. घटनेनंतर शेजाऱ्यांनी आरडाओरड ऐकून धाव घेतली असता सुमित्राबाई यांचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
advertisement

हत्या करणारा मुलगा पोलिसांच्या ताब्यात

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आरोपी दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले असून, दारूच्या व्यसनामुळेच त्याचा स्वभाव आक्रमक बनल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जगदीश पेटकुले याला ताब्यात घेऊन अटक केली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement

आई-मुलाच्या नात्याला काळिमा

या घटनेमुळे डोंगरगाव परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
 दारूची नशा अन् कारल्याचा राग! पोटच्या मुलाने 65 वर्षीय आईचा जीव घेतला; डोंगरगावची धक्कादायक घटना
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement