माझं नाव नाही घेतलं? जिल्हाध्यक्षाने आक्षेप घेतला, तटकरेंनी अजितदादा स्टाईलने झापलं

Last Updated:

Ajit Pawar: अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे परतूर-मंठा विधानसभेचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया आणि युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

सुनील तटकरे
सुनील तटकरे
परभणी : परतूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग झाले. सुरेशकुमार जेथलिया यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात आक्षेप घेणाऱ्या जिल्हाध्यक्षांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार स्टाईलने झापले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे परतूर-मंठा विधानसभेचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया आणि युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमाला प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजेश विटेकर, जालना-संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आदी नेते उपस्थित होते.
advertisement

तटकरेंनी जिल्हाध्यक्षाला अजितदादा स्टाईलने झापलं

यावेळी पक्षाचे जालना जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांनी माझे नाव घेतले नाही, असा आक्षेप सुनील तटकरे यांच्या भाषणावेळी घेतला. त्यावेळी तुमचे नाव आधी घेतले. तुम्ही गप्पा मारण्यात दंग होतात. मी अध्यक्ष असल्याने अध्यक्षाचा सन्मान माझ्याएवढा कुणी करू शकत नाही, अशा शब्दात तटकरे यांनी आक्षेप घेणारे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांना सुनावले.
advertisement
पक्षात शिस्त महत्वाची आहे. आमदारांआधी मी जिल्हाध्यक्षांचे नाव घेतले. हळूहळू तुम्हालाही शिस्त लागेल. शिस्त लागली की आपोआप घेतलेली नावे ऐकायला येतील, असेही तटकरे यांनी अरविंदराव चव्हाण यांना ऐकवले.

सुरेशकुमार जेथलिया यांच्या पक्षप्रवेशानंतर अजित पवार काय म्हणाले?

माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या या पक्षात मी जेथलिया यांचं आणि तमाम कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो. या भव्य अशा प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं नवीन जनसेवेकरी आमच्यात सामील झाल्यानं पक्ष अधिक बळकट बनला आहे. पक्षानं हाती घेतलेल्या जनकल्याणाच्या कार्यात सगळेजण नव्या ऊर्जेनं कामाला लागतील, असा विश्वास मला आहे, असे म्हणत त्यांनी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
माझं नाव नाही घेतलं? जिल्हाध्यक्षाने आक्षेप घेतला, तटकरेंनी अजितदादा स्टाईलने झापलं
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement