मनोज जरांगे यांना मराठा संघटनांकडून एकटे पाडण्याचा प्रयत्न, सुरेश धस पाटलांच्या मदतीला धावले

Last Updated:

Manoj Jarange Patil: जरांगे पाटील यांच्या मराठवाड्यात दुसरी मोठी परिषद घेण्याची घोषणा करण्यात आली असून जरांगे पाटील यांना हा शह मनाला जात आहे.

मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस
मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस
धाराशिव : मराठा आरक्षणाच्या लढाईत मनोज जरांगे पाटील एकटे पडणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण आज ४२ मराठा संघटनांनी कोल्हपुरात एकत्र येऊन परिषद घेत आमच्या मागण्या जरांगे पाटील यांच्यापेक्षा वेगळ्या असल्याचे सांगितले. मराठा संघटनांच्या या पवित्र्यामुळेच जरांगे पाटील यांना ठरवून एकटे पाडले जात असल्याचे बोलले जाते.
कोल्हापुरात राज्यस्तरीय परिषद घेत एकत्रितरित्या मराठा आरक्षणाची लढाई पुढे घेऊन जाण्याचा विविध संघटनांनी केलाय. दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या मराठवाड्यात दुसरी मोठी परिषद घेण्याची घोषणा करण्यात आली असून जरांगे पाटील यांना हा शह मनाला जात आहे.

...तर गैरअर्थ काढू नका, सुरेश धस जरांगे पाटलांच्या मदतीला धावले

जरांगे पाटील यांची कोंडी होत असताना त्यांच्या मदतीला भाजप आमदार सुरेश धस धावले आहेत. एखाद्या जिल्ह्यात कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाला जरांगे पाटलांना बोलवलं नाही तर त्याचा गैरअर्थ काढणे चुकीचे आहे, असे सुरेश धस म्हणाले.
advertisement
कोल्हापूरमध्ये मनोज जरांगे यांना वगळून मराठा समाजाच्या इतर संघटनांनी अधिवेशन बोलावलं होतं. ते अधिवेशन जिल्ह्यापुरते असून त्याला जिल्ह्यापुरतेच महत्त्व आहे. म्हणून जरांगेंना बोलावलं नाही म्हणून गैरअर्थ काढू नका, असे सुरेश धस म्हणाले.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आता नव्याने ठिणगी पडली

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आता नव्याने ठिणगी पडली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांची ताकद एकवटली त्यातून सरकारवर दबावही निर्माण झाला. मात्र त्यांच्या बदलणाऱ्या भूमिकांमुळे नेमके हाती काय लागले? हा सवाल मराठ्यांना पडत आहे. त्यामुळे ज्या संघटनांनी एकत्र येत मराठा क्रांती मोर्चा सारखे आंदोलन उभे करून मराठी मनात हुंकार आणि स्फूर्ती भरली.
advertisement
त्या संघटना आता पुन्हा एकवटल्या आहेत. शिवसंग्राम, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, राष्ट्रीय मराठा महासंघ, मराठा आरक्षण समन्वय समिती, मराठा क्रांती ठोक मोर्चा अशा 42 संघटनांनी आज कोल्हापुरात राज्यव्यापी बैठक घेऊन पुन्हा एल्गार पुकारला आहे. त्यानुसार 10 मार्चपर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मनोज जरांगे यांना मराठा संघटनांकडून एकटे पाडण्याचा प्रयत्न, सुरेश धस पाटलांच्या मदतीला धावले
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement