21 वर्षांची तरुणी झाली मेकअप गुरू, स्वतःच्या हिंमतीवर सुरू केला मेकअप स्टुडिओ
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
सृष्टी वाघमारे असे या तरुणीचे नाव आहे. ती कल्याण येथील रहिवासी आहे. सृष्टी ही सध्या आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट म्हणून नावारूपाला येत आहे.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
कल्याण : काही जण असे असतात जे कुठल्याही परिस्थितीत आपली आवड जोपासतात आणि जिद्दीने त्या परिस्थितीला सामोरे जातात. आज अशाच एका तरुणीची कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत.
सृष्टी वाघमारे असे या तरुणीचे नाव आहे. ती कल्याण येथील रहिवासी आहे. सृष्टी ही सध्या आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट म्हणून नावारूपाला येत आहे. तिचे वय फक्त 21 वर्षे आहे. ती लहान असतानाच तिचे वडील वारले, त्यानंतर तिच्या आईनेच मेहनत आणि कष्ट करून तिला आणि तिच्या लहान भावाला वाढवले. सृष्टी सध्या मास मीडियाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे.
advertisement
2 वर्षांपूर्वीच तिने मेकअप आर्टिस्ट म्हणून कोर्स पूर्ण केला. त्यानंतर ती वर्षभर ब्रायडल, डोहाळे, लग्न, वाढदिवस, वर्कशॉप या विविध लूक्सचे ऑर्डर घेत राहिली. कॉलेज आणि काम या दोन्ही गोष्टी सांभाळताना तिची प्रचंड धावपळ व्हायची. मात्र, याच धावपळीतून तिने अथक प्रयत्न करुन पैसे जमा केले आणि स्वतःचा मेकअप स्टुडीओ सुरू केला. आता या स्टुडिओमध्ये तिचे अनेक विद्यार्थी तिच्याकडून मेकअपचे प्रशिक्षण घ्यायला येतात. अवघ्या 21 वर्षांची असणारी सृष्टी आता मेकअप गुरू झालेली आहे.
advertisement
सगळ्या मुलींनी आपापल्या पायावर उभे राहावे -
'मी मेकअप आर्टिस्ट व्हावं, ही माझ्या आईची इच्छा होती, म्हणूनच मी मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला, 2 वर्षे मेहनत करून पैसे जमा केले आणि स्वतःचे मेकअप स्टुडिओ सुरू केले. यासाठी वेळ लागला, प्रचंड मेहनत लागली. पण या सगळ्या प्रवासात माझ्या आईने आणि भावाने मला साथ दिली. आताही कॉलेज सांभाळून मी माझ्या विद्यार्थिनींना शिकवते. सगळ्या मुलींनी आपापल्या पायावर उभे राहावे म्हणजे कोणाकडे हात पसरायची वेळ येत नाही, हे मी माझ्या अनुभवातून शिकले, या शब्दात सृष्टी वाघमारे या तरुणीने आपल्या भावना लोकल18 शी बोलताना व्यक्त केल्या.
advertisement
सृष्टी सध्या एका ब्रायडल मेकअपचे 15 ते 20 हजार रुपये घेते. ती सगळया प्रकारचे मेकअप करण्यात तरबेज झाली आहे. त्यासोबतच ती इंब्रॉइडरी ज्वेलरीसुद्धा बनवते. या तरुणीचा हा प्रवास तरुणाईसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
advertisement
Location :
Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
First Published :
July 18, 2024 5:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
21 वर्षांची तरुणी झाली मेकअप गुरू, स्वतःच्या हिंमतीवर सुरू केला मेकअप स्टुडिओ