तीच चव अन् तीच फिलिंग, कल्याणमध्येही मिळते शेगाव कचोरी, 15 वर्षांच्या व्यवसायाची प्रेरणादायी गोष्ट!
- Reported by:Piyush Patil
- local18
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
कल्याणवरून गजानन महाराजांची पालखी येते. त्यामुळे त्यांची गाठ कल्याणच्या माणसांशी जुळली आणि त्यांनी कल्याणमध्ये यायचं ठरवलं आणि येथेच ते कचोरी विकू लागले.
पियूष पाटील, प्रतिनिधी
कल्याण : शेगाव हा शब्द कानावर पडल्यावर गजानन महाराज आणि शेगावची फेमस शेगाव कचोरी आपल्याला नक्की आठवतात. हीच फेमस आणि अस्स्स्ल चवीची शेगाव कचोरी कल्याणमध्येही मिळते. मागील 15 वर्षांपासून किशोर गेहाने हे कल्याणमध्ये शेगाव कचोरी सेंटर चालवत आहेत.
किशोर गेहाने हे मूळचे शेगावचे आहेत. आधी ते शेगावच्या कँटीनमध्ये काम करायचे. तिथेच ते कचोरी बनवायचे तंत्र शिकले. कल्याणवरून गजानन महाराजांची पालखी येते. त्यामुळे त्यांची गाठ कल्याणच्या माणसांशी जुळली आणि त्यांनी कल्याणमध्ये यायचं ठरवलं आणि येथेच ते कचोरी विकू लागले. जेव्हा त्यांनी कचोरी विकायला सुरुवात केली तेव्हा एका कचोरीची किंमत 7 रुपये होती. आता कचोरीची किंमत 14 रुपये आहे.
advertisement
किशोर गहाने यांच्या या व्यवसायाला आता 15 वर्षे झाली. पण कचोरीच्या चवीत जराही बदल झाला नाही, असं खवय्ये आवर्जून सांगतात. काही ग्राहक तर चार-सहा गरमागरम कचोरी एकावेळी खाऊन जातात, असे शेगाव कचोरी येथील व्यवस्थापक सांगतात. कचोरी आणि चहा हे समीकरण ग्राहकांना फार आवडते.
कोरोनाकाळात नोकरी गेली, गावी परतून सुरू केला व्यवसाय, आज महिन्याला तब्बल इतक्या रुपयांची उलाढाल
कल्याणमध्ये आल्यापासून कल्याणकरांनी भरभरून दिले आहे. रोज 1200 ते 1500 कचोरींची विक्री होते. तसेच समोसा, खमंग ढोकळा या पदार्थांनाही चांगली मागणी असते. चहा प्रेमींसाठी आम्ही स्पेशल चहाही ठेवतो, असे किशोर गहाने सांगतात.
advertisement
शेगाववरुन कल्याणमध्ये येऊन किशोर गहाने यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आज ते यशस्वीरित्या आपल्या व्यवसाय करत आहेत. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. शेगाव कचोरीला ट्रेडमार्क नसल्याने कोणीही कचोरीचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो, असे किशोर गहाने आवर्जून सांगतात.
advertisement
Location :
Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
First Published :
Jul 18, 2024 4:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
तीच चव अन् तीच फिलिंग, कल्याणमध्येही मिळते शेगाव कचोरी, 15 वर्षांच्या व्यवसायाची प्रेरणादायी गोष्ट!







