डोंबिवलीत मिळते चविष्ट व्हेज चायनीज, व्हरायटी इतकी की तुम्हीही थक्क व्हाल, खवय्यांचे आवडीचे ठिकाण आहे तरी कुठे?

Last Updated:

dombivali famous chinese - संकेत खोतच्या या चायनीजच्या दुकानात चिली, चिली कॉम्बो, सुप, भेळ, राईस, नूडल्स यामध्ये खूप प्रकार उपलब्ध आहेत. इथे कॉम्बोमध्ये राईस, नूडल्स, मंच्युरियन, चिली, मोजिटो या सगळया गोष्टी फक्त 99 रुपयांना मिळतात.

+
द

द ग्रीन वॉक व्हेज चायनीज शॉप डोंबिवली

साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे - डोंबिवलीत अनेक खाद्यपदार्थांची ठिकाणे आहे. यामध्ये आता व्हेज चायनीज ते सुद्धा अगदी स्वस्त किमती उपलब्ध झाले आहे. डोंबिवलीत पहिल्यांदाच द ग्रीन वॉक म्हणून व्हेज चायनीजचे दुकान सुरू झाले आहे. द ग्रीन वॉक या डोंबिवलीतील सुभाष रोड जवळ असणाऱ्या दुकानात चायनीजचे सगळे पदार्थ अगदी स्वस्त किमतीत मिळतात.
संजय खोत असे या हॉटेलच्या मालकाचे नाव आहे. संजय खोत या तरुणाने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. यानंतर या डोंबिवलीकर तरुणाने एक वर्षापूर्वी या चायनीजच्या व्यवसायाला सुरुवात केली. संकेत खोतच्या या चायनीजच्या दुकानात चिली, चिली कॉम्बो, सुप, भेळ, राईस, नूडल्स यामध्ये खूप प्रकार उपलब्ध आहेत. इथे कॉम्बोमध्ये राईस, नूडल्स, मंच्युरियन, चिली, मोजिटो या सगळया गोष्टी फक्त 99 रुपयांना मिळतात. भेल का खजाना यामध्ये वॉक भेल, तडका भेल, मंचुरियन चायनीज भेल सुध्दा 20 रुपयांपासून मिळतात. मोमोजमध्ये सुद्धा व्हेज मोमोज, पनीर मोमोज, पनीर टिक्का मोमोज सुद्धा खूप फेमस आहेत. यांची किंमत 80 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
Sindhudurg News : परतीच्या पावसाचा भातशेतीला मोठा फटका, पिकं जमिनीदोस्त; डोळ्यात अश्रू आणणारी दृश्य
'मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच मला चायनीजचा व्यवसाय करायची इच्छा होती. हॉटेल मॅनेजमेंट झाल्यानंतर मी लगेचच हा व्यवसाय सुरू केला. आमच्या इथे मिळणारा व्हेज चायनीज खूप प्रसिद्ध आहे. संपूर्णपणे प्युअर व्हेज चायनीज ठेवण्यामागचं कारण असे की, अनेकांना नॉनव्हेज चायनीज खाता येत नाही. त्या सर्वांना चायनीज फूडचा आनंद घेता यावा आणि इतरही गुरुवार, शनिवार या दिवसांना चायनीज खाता यावे यासाठीच मी या दुकानाची सुरुवात केली,' असे द ग्रीन वॉक या दुकानाचे व्यावसायिक संकेत खोत यांनी सांगितले. तर मग तुम्हालाही येथील ही चव चाखायची असेल तर तुम्ही इथल्या चायनीज फूडची चव चाखू शकता.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
डोंबिवलीत मिळते चविष्ट व्हेज चायनीज, व्हरायटी इतकी की तुम्हीही थक्क व्हाल, खवय्यांचे आवडीचे ठिकाण आहे तरी कुठे?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement